‘जया अमिताभ बच्चन’ म्हटल्यामुळे उपराष्ट्रपतींना हटवण्याचा प्रस्ताव? विरोधकांची नेमकी खेळी काय ?

Описание к видео ‘जया अमिताभ बच्चन’ म्हटल्यामुळे उपराष्ट्रपतींना हटवण्याचा प्रस्ताव? विरोधकांची नेमकी खेळी काय ?

#BolBhidu #JayaAmitabhBacchan #jagdeepdhankhar

असं बोललं जातं बंगालमधील भाजप नेत्यांनी जेवढा त्रास मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना दिला नसेल तेवढा राज्यपाल जगदीप धनखड यांनी एकट्याने दिला. या किस्स्यावरून जगदीप धनखड नियम आणि कायद्याच्या बाबतीत किती आग्रही होते हे दिसून येतं.

आता हेचं जगदीप धनखड देशाचे उपराष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे सभागृह कायदा आणि नियमांप्रमाणे चालवण्यावर त्यांचा भर असतो. पण, हीच गोष्ट कधी कधी त्यांना अडचणीत देखील आणते. नुकतच राज्यसभेच पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात राज्यसभेच्या कामकाजापेक्षा जया बच्चन यांना जया बच्चन म्हणायचं की जया अमिताभ बच्चन म्हणायचं याचीच चर्चा जास्त झाल्याचं पाहायला मिळालं. जया बच्चन याचं राज्यसभेच्या रजिस्टरमध्ये नाव जया अमिताभ बच्चन आहे. उपसभापती हरिवंश सिंग चेअरवर असतांना यांनी तेच नाव उच्चारलं. त्यावरून जया बच्चन नाराज झाल्या. त्यांना फक्त जया बच्चन म्हणण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर देखील जया बच्चन यांच्या नावावरून अनेक वेळा हसी-मजाक झाली. पण, जया बच्चन यांना एका पॉईंटनंतर ही गोष्ट आवडली नाही. तेव्हा त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना ही गोष्ट बोलून दाखवली.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке