Munj mangalashtaka..

Описание к видео Munj mangalashtaka..

संकल्पना,निर्मिती,गायन-(स्वरदा अमित गोडबोले)
#threadceremony#marathisong#munjmangalashtakasong




वेद ऋचांचा मंत्र चालला ,
बटु दे रे अवधान
प्रभु दे बटूला आशिष दान

आप्त मंडळी जमली सगळी
मौजी बंधना प्रभा आगळी
काका, मामा असता जवळी
नाही कशाची वाण !

व्रतबंधाचा मंडप सजला
सनई चौघडा वाजे मंजुळा
सकल जनांना मोद जाहला
हरपून जाई भान !

प्रेमळ माता पिता लाभले
आमुच्या बटूचे भाग्य उजळले
आश्रम पहिला सुरु जाहला
ज्ञानाचे वरदान !

काव्य -बळवंत गोखले
संगीत -सुरेश गोखले

Комментарии

Информация по комментариям в разработке