संदीप वावगे यांच्या मिरची पिकाची यशोगाथा. Success Story Of Sandip Wavge chilli crop

Описание к видео संदीप वावगे यांच्या मिरची पिकाची यशोगाथा. Success Story Of Sandip Wavge chilli crop

#मिरची पिकाची यशोगाथा #फायदेशीर मिरची पिक #chilli crop

१२ गुंठ्यात ३ हजार मिरचीच्या रोपांची लागवड .. ५ महिन्यात मिरचीतून लाख रुपयांचा नफा.१२ गुंठ्यात साडे तीन टन मिरचीचे उत्पन्न..मिरचीमुळे कुटूंबाला रोजगार निर्मिती.. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत ..
 विजय मोरे 
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातल्या सोनवडी सुपे इथले संदीप रामदास वावगे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. संदीपने यंदा पारंपरिक शेतीला फाटा देवून आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबला आहे. संदीपने यंदा जून महिन्यात मिरचीची लागवड केलीयं. यापूर्वी संदीप आपल्या या शेतात पूर्वी मका, ज्वारी , गहू, बाजरी अशी भुसार पिकं घेत होते. मात्र त्यांना त्या पिकात म्हणावे, असे परवडत नव्हते. त्यामुळे संदीपने यंदा बाजार पेठेचा आभ्यास करुन बेडवर ठिबक सिंचनचा वापर करुन १२ गुंठ्यात मिरचीची लागवड केलीयं. मार्च महिन्यात मिरचीसाठी १२ गुंठे जमिनीला चार ट्रॉली शेणखत घातल होतं. त्यानंतर बेड काढून ३ हजार मिरचीच्या रोपांची दोन फूट अंतर ठेवून जुलै महिन्यात  लागवड केलीयं. 
सप्टेंबर महिन्यात मिरचीची तोडणी सुरु झाली असून मिरची तोडणीचे काम घरच्याघरी करत असल्यामुळे मजूरांवर होणारा खर्च वाचतोय.  संदीपची आई - वडील आणि त्यांच्या पत्नी मिरची तोडणीचे काम करतात. घरातील महिलांना स्वताच्या शेतावर मिरची तोडणीमुळे घरच्या घरी काम मिळालयं. 
संदीपला मिरची लागवड, खत व्यवस्थापन आणि औषधासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च आलायं तर मिरचीतून संदीपला आत्तापर्यंत ८० ते ९० हजार रुपये खर्च वाजा जाता निव्वळ नफा मिळालायं. अजून मिरचीचे दोन तीन तोडे होतील, असा संदीपला विश्वास वाटतोय. 
एकूणच अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देवून बाजार पेठेचा आभ्यास करुन पिक पध्दतीत बदल केल्यास आणि पिकाचे काटेकोरपणे व्यवस्थापन केल्यास कमी जमिनीत, कमी पाण्यावर  भाजीपाल्या सारख्या पिकातून चांगला नफा मिळू शकतो. हेच संदीपने दाखवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

Комментарии

Информация по комментариям в разработке