आता दुधाचे एटीएम मशीन बाजारात । फिल्टर प्लांटसारखा कमवा पैसा | Milk ATM Machine | Shivar News 24

Описание к видео आता दुधाचे एटीएम मशीन बाजारात । फिल्टर प्लांटसारखा कमवा पैसा | Milk ATM Machine | Shivar News 24

नाशिक येथील भावसार बंधूंनी दुधाचे एटीएम मशीन बनविले आहे. कुठलाही माणूस न ठेवता, कमी गुंतवणुकीत पैसा कमावण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. चौकात किंवा मोक्याच्या जागेवर घर असणाऱ्यांना दूध एटीएम मशीन बसवून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. किराणा दुकानदार, दूध विक्रेते, केक शॉप, डेअरी प्रोडक्ट विक्रेत्यांचे या दुधाच्या एटीएम मशीनमुळे मेहनत वाचणार असून, या एटीएममध्ये २४ तास दूध ठेवता येते. त्यामुळे ग्राहकांची सोय होणार असून, दूध विक्रेत्यांना २४ तास एटीएम मशीनद्वारे पैसा मिळू शकतो. दूध एटीएम मशीनमुळे दूध देताना कुणाचाही हात लागणार नाही, त्यामुळे शुद्धता राहणार आहे. दूध उत्पादकांना दूध डेअरीला न देता हे मशीन मोक्याच्या जागेवर बसवून जादा पैसा कमावता येणार आहे. थेट शेतकऱ्याकडून दूध खरेदी केल्याने ग्राहकांना खात्रीशीर दूध मिळणार आहे.

milkatmmachine
#businessideas
#marathiudyog
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке