Navneet Rana यांच्यानंतर Ravi Rana यांची जागाही धोक्यात ? Badnera विधानसभा मतदारसंघाची समीकरणं काय ?

Описание к видео Navneet Rana यांच्यानंतर Ravi Rana यांची जागाही धोक्यात ? Badnera विधानसभा मतदारसंघाची समीकरणं काय ?

#BolBhidu #RaviRana #BadneraAssembly

२०१९ च्या लोकसभेला नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या होत्या. पण २०२४ येईपर्यंत त्यांचं राजकारण पूर्णपणे हिंदुत्ववादी झालं. लोकसभेच्या आधी तर त्यांनी 'देश में रहना होगा, तो जय श्री राम कहना होगा', अशी घोषणाच दिली होती. यामुळे नवनीत राणा यांची इमेज संपूर्ण देशात 'हिंदू शेरनी' अशी झाली. पण याच इमेजचा फटका त्यांना लोकसभेत बसल्याचं सांगितलं जातं. यावेळी त्या भाजपच्या तिकीटावर उभ्या होत्या. भाजपचं सगळं केडर त्यांच्या बाजूनं कामाला लागलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्यासाठी सभाही घेतली होती.

तरीही त्यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव झाला. अमरावतीतून काँग्रेसचे बळवंत वानखेडे जिंकले. नवनीत राणा यांच्या पराभवानंतर त्यांचे पती रवी राणा यांचं काय होणार? हा प्रश्न अनेकांना पडलाय. अलीकडेच रवी राणा यांनी महायुतीकडून स्वत:ची उमेदवारी जाहीर केलीय. विशेष म्हणजे महायुतीचं जागावाटप झालं नसताना, त्यांनी स्वत:च्या नावाची घोषणा केलीय. पण त्यांची यंदाची लढत कशी असू शकते? बडनेरा मतदारसंघात नेमकी राजकीय समीकरणं काय असू शकतात? रवी राणा इथून सलग चौथ्यांदा जिंकतील का? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке