Raw Mango Drink/पन्हं/कैरीचं पन्हं/Summer Cooler Drink/उन्हाळा विशेष-पन्हं/ Recipe Time With Janhavi

Описание к видео Raw Mango Drink/पन्हं/कैरीचं पन्हं/Summer Cooler Drink/उन्हाळा विशेष-पन्हं/ Recipe Time With Janhavi

Raw Mango Drink/ Raw Mango Sharbat/ Kairi Panha/ कैरीचं पन्हं /उन्हाळा विशेष कैरी पन्हं/ Summer Cooler Raw Mango Drink

Raw Mango Drink is a traditional Maharashtrian drink. As Raw Mango or Kairi ( कैरी) is available in Summer, it is Summer Special Drink. In hot summer days, a glass of Kairi Panha cools down the body. As it is rich in Vitamin C, it helps to refresh. This is very simple and easy recipe.


कैरीचं पन्हं

साहित्य :
कैऱ्या - १ किलो
बारीक चिरलेला गूळ- प्रमाण कृतीमध्ये दिले आहे.
वेलची पूड- १/२ टीस्पून
केशर - १/४ टीस्पून

पन्ह्याचा बलक (स्क्वॅश) बनवण्याची कृती :
कैऱ्या स्वच्छ धुऊन घ्याव्या. कुकरच्या डब्यात कैऱ्या ठेवून त्यात डब्याचा तळ बुडेल इतकेच पाणी घालावे. कुकरमध्ये तळाला २ कप पाणी घालून त्यात वायर स्टॅन्ड ठेवावा व त्यावर डबा ठेवून ३-४ शिट्या करून कैऱ्या उकडवून घ्याव्या. कुकर नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर कैऱ्या बाहेर काढाव्या. कैऱ्यांची सालं काढून सगळा गर काढून घ्यावा.
गराच्या समप्रमाणात गूळ घ्यावा. गर व गूळ एकत्र करून मंद ते मध्यम आचेवर मिश्रण सतत ढवळत गूळ विरघळेपर्यंत शिजवावे. साधारणतः ३ ते ४ मिनिटानंतर मिश्रणात हलके हलके बुडबुडे यायला सुरुवात होते व गूळही विरघळतो. आता गॅस बंद करावा व वेलची पूड आणि केशर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
मिश्रण रूम टेम्परेचरला आल्यावर हवाबंद काचेच्या बरणीत भरावे.

पन्हं बनवण्याची कृती:
ग्लासमध्ये आवडीप्रमाणे बर्फ घालावा. २ चमचे कैरीचा बलक घालावा. पाऊण ग्लास भरेल एव्हढे थंड पाणी घालावे. चिमूटभर मीठ घालून चमच्याने व्यवस्थित ढवळावे.

उन्हाळा विशेष थंडगार कैरीचं पन्हं तयार !

टीप:
१) शक्यतो तोतापुरी कैऱ्या घ्याव्या.
२) गूळ वापरल्याने पन्ह्याला खमंग स्वाद येतो. पिवळा गूळ वापरल्याने पन्ह्याला छान रंग येतो.
३) यामध्ये व्हिटामिन सी असल्यामुळे आरोग्याला लाभदायक असतं.
४ ) उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्याचं कार्य करतं.
५) हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवला तर जास्त काळ टिकतो. बरणी स्वच्छ धुऊन नीट कोरडी केलेली असावी.
टिकण्याचा काळ: * फ्रिजमध्ये - १ महिना / फ्रिजशिवाय - १० ते १५ दिवस

Комментарии

Информация по комментариям в разработке