Kharvas/खरवस (गूळ घालून)/Kharvas recipe with Jaggery/चिकापासून खरवस/Kharvas Recipe/खरवस रेसिपी

Описание к видео Kharvas/खरवस (गूळ घालून)/Kharvas recipe with Jaggery/चिकापासून खरवस/Kharvas Recipe/खरवस रेसिपी

#kharvasrecipe
#kharvas
#sweetrecipe
#milkrecipe
#milkrecipes
#milkpuddingrecipe
#milkpudding
#rawmilk

Kharvas/ खरवस

Kharvas is a traditional sweet that is made with buffalo's or cow's colostrum milk (lactating buffalo's or lactating cow's milk in the initial days). This sweet can be made with jaggery or sugar. colostrum milk or cheek is available in dairy. Texture of Kharvas is like paneer. It is more softer than paneer. Kharvas is easy to make. It contains high amount of protein. It has shelf life of 3-4 days, if kept in refrigerator.

खरवस

साहित्य:
चीक (म्हशीचा ) - ५०० मिली
दूध (म्हशीचे) - २५० मिली
गूळ- २०० ग्रॅम
जायफळ पूड- १/२ टीस्पून
वेलची पूड- १/२ टीस्पून
केशर- आवडीप्रमाणे (ऐच्छिक आहे)

कृती:
चिकामध्ये गूळ घालून ढवळून गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यावा. नंतर त्यामध्ये कच्चं दूध घालून ढवळून घ्यावं. मिश्रण गाळून घ्यावं. एकीकडे पातेल्यात किंवा कुकरमध्ये २ कप पाणी उकळत ठेवावे. खरवसाचे मिश्रण एखादया स्टीलच्या डब्यात/ स्टीलच्या भांड्यात ओतावे. त्यात जायफळ पूड, वेलची पूड आणि केशर घालावे. पाणी छान उकळले की कुकर किंवा पातेल्यात मिश्रणाचा डबा ठेवून झाकण लावून मध्यम आचेवर २० मिनिटे वाफवून घ्यावे.
नंतर वाफवलेल्या मिश्रणाचा डबा बाहेर काढून गार होऊ द्यावा.
गार झाल्यावर आवडीप्रमाणे वड्या कापाव्या.

टीप: १) चीक आणि दूध नॉर्मल टेम्परेचरला असलेले घ्यावे. कच्चं दूधच (डेरीमधून आलेले तसेच न तापवता )वापरावे.
२) गुळाऐवजी साखर घालूनही खरवस करता येतो. म्हशीच्या चिकाऐवजी गायीचा चिक वापरला तरी चालेल. गायीचं चिकाचं दूध वापरलं तर दुधसुध्दा गायीचं घ्यावं.
३) मिश्रण गाळून घ्यावे म्हणजे गुळात कचरा किंवा खडे असतील तर ते खरवसात येणार नाहीत.
४) कुकरमध्ये खरवस वाफवताना शिटी लावू नये.
५) खरवस फ्रिजमध्ये ठेवल्यास ३-४ दिवस छान टिकतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке