Savner Vidhan Sabha | Sunil Kedar यांना निवडणूक लढण्यास बंदी , त्यांनी आता वेगळाच पर्याय समोर आणलाय

Описание к видео Savner Vidhan Sabha | Sunil Kedar यांना निवडणूक लढण्यास बंदी , त्यांनी आता वेगळाच पर्याय समोर आणलाय

#SunilKedar #AnujaKedar #SavnerVidhanSabha #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes

यंदा लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती. भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्यानं विरोधकांचं धाबं दणाणलं होतं. खासकरून विदर्भामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार अशा बड्या नेत्यांची फौज असल्यामुळं भाजप विदर्भाचं मैदान सहज मारेल, अशी अपेक्षा होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात केली, तीही विदर्भापासून...१० एप्रिल रोजी त्यांची पहिली सभा पार पडली, नागपूर नजीकच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान या ठिकाणी...मतदान झालं, निकालही लागला. परंतु या निकालानं महायुतीला धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होऊनही रामटेकमध्ये महायुतीचे उमेदवार राजु पारवे यांचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या तिकिटावर लढणारे महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांचा विजय झाला. रामटेकमधील काँग्रेसच्या या विजयाचे खरे शिल्पकार होते काँग्रेसचे विदर्भातील बाहुबली नेते सुनील केदार...सावनेर विधानसभा मतदारसंघाचे तब्बल पाचवेळा आमदार राहिलेल्या सुनील केदार यांनी विदर्भातील भाजपच्या तगड्या नेत्यांचं आव्हान स्वीकारत आपलं वर्चस्व कायम राखलंय. परंतु २०२४ मध्ये मात्र त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. कारण एका प्रकरणात न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी सहा वर्षांची बंदी घातलीये, त्यामुळं काँग्रेसला त्यांच्याऐवजी नवा उमेदवार द्यावा लागणार आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? सुनील केदार सावनेर विधानसभा मतदारसंघात कुणाला उभे करणार? महायुतीकडून त्यांना कुणाचं आव्हान असू शकतं? आणि सुनील केदार आपला बालेकिल्ला राखू शकतील का? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf


Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://marathi.indiatimes.com.
https://marathi.timesxp.com/


About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Mah

Комментарии

Информация по комментариям в разработке