तळोदा तालुक्यातील काजीपुर परिसरात बिबट्याने हल्ला करून आजीसह नातवाला केले भक्ष

Описание к видео तळोदा तालुक्यातील काजीपुर परिसरात बिबट्याने हल्ला करून आजीसह नातवाला केले भक्ष

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील काजीपुर परिसरात 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून आजीसह नातवाला भक्ष केले आहे, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, या संदर्भात तात्काळ वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात अतुल पाडूरंग सुर्यवंशी यांच्या मळ्यात राखणदारी करणारी साकरा खेमा तडवी ही महिला मजुरीसाठी गेली होती, मात्र तिला परत येण्यास उशीर झाल्याने, तिचा नातू श्रावण शिवाजी तडवी हा मजुरीसाठी केलेल्या परिसरात शोधण्यासाठी गेला असता, अचानक बिबट्याने हल्ला करून त्याला ऊसात ओढून नेले, त्याचा आवाज आजीला आल्याने ती त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे पळाली, तर नातवाला सोडून बिबट्याने नातवाला शोधण्यासाठी आलेल्या आजीवर देखील हल्ला केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला, घटनास्थळी तळोदा वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते, दोघा नातू व आजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळोदा उपाजिल्हा रुग्नालयात नेण्यात आला, तळोदा तालुक्यातच मागील आठवड्यात चिनोदा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक बालक मृत्यु झाल्याची घटना घडली होती ती असताना, पुन्हा बिबट्याच्या हल्यात दोन जणाचा बळी गेला आहे, आता तरी वनविभाग बिबट्याला जेरंबद करेला का ? की अजून किती जणांचे बळी बिबट्याच्या माध्यमातून वनविभाग घेणार असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थीत होते आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке