गावच्या देव दिवाळीचा फराळ 😍 | तांदळाची चविष्ट बोरं Tandalachi Bora - रत्नागिरी (Konkan)

Описание к видео गावच्या देव दिवाळीचा फराळ 😍 | तांदळाची चविष्ट बोरं Tandalachi Bora - रत्नागिरी (Konkan)

गावच्या देव दिवाळीचा फराळ 😍 | तांदळाची चविष्ट बोरं Tandalachi Bora - रत्नागिरी (Konkan) कोकणामधील गावी दिवाळीला फराळ बनवला जातो. गावी कोकणात देव दिवाळीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. भागवत एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी या दिवशी देवाची दिवाळी असते, कोकणचे त्या दिवाळीला देवाची दिवाळी किंवा मोठी दिवाळी असे बोलतात. या दिवसापासून तुळशी विवाह मुहूर्त सुरू होतात. शहरात जसे दिवाळीनिमित्त फराळ केला जातो तसाच फराळ कोकणात गावी सुद्धा केला जातो. कोकणचे तांदूळ हे मुख्य पीक असल्यामुळे पहिल्यापासून तांदळाचे बरेच गोड पदार्थ बनवले जातात. तांदळाची बोरं हे सुद्धा त्यातील एक पदार्थ आहे. दरवर्षी खास दिवाळीच्या मोसमात तांदळाची बोरं बनवली जातात. ही तांदळाची बोरं बनवणं अतिशय सोपं आहे. ही बोरं चविष्ट असतात. एक बोर खाऊ तर खाताच राहावे असे वाटत राहते. आमच्या घरी देव दिवाळीनिमित्त तांदळाची बोरं बनवली होती. आईने खास पारंपरिक पद्धतीने चुलीवर ही तांदळाची बोरं तयार केली आहेत. #TandalachiBora #RiceFlourRecipe #KonkaniRecipe #sforsatish
तांदळाची बोरं तयार करताना जास्त साहित्य लागत नाहीत. तांदळाचे पीठ जे खास जात्यावर दळले जाते. सफेद तीळ, गूळ, वेलची पावडर, ओल्या नारळाचा किस, तेल असे कमीत कमी साहित्य लागते. गूळ चांगले बारीक किसून त्यात वेलची पावडर आणि तांदळाचे पीठ एकत्र करून गरम पाणी ज्याला गावी कळतवणी बोलतात ते घेऊन पीठ मळले जाते. तीळ घालून त्या पिठाची बारीक बोरं हातावर तयार केली जातात. कढईमध्ये तेल तापल्यावर त्यात तयार केलेली बोरं तळली जातात. अशी तळलेली तांदळाची बोरं खाण्याची मजा काही निराळीच असते. गावावरून खास शहरातील आपल्या चाकरमान्याला तांदळाची बोरं दिवाळी भेट देण्याची पद्धत आहे. कोकणी खाद्य संस्कृतीमध्ये बरेच पदार्थ कमीत कमी साहित्यात अतिशय चविष्ट रुचकर बनवले जातात. कोकणात तांदळाची बोरं हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. आम्ही बनवलेली तांदळाची बोरं तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !

माझ्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा!

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке