नारळ लागवड करताना कोणत्या जातीची निवड करावी नारळ लागवड विषयी संपूर्ण माहिती नारळाची लागवड कशी करायची

Описание к видео नारळ लागवड करताना कोणत्या जातीची निवड करावी नारळ लागवड विषयी संपूर्ण माहिती नारळाची लागवड कशी करायची

नारळ लागवड करताना कोणत्या जातीची निवड करावी नारळ लागवड विषयी संपूर्ण माहिती नारळाची लागवड कशी करायची ♥ नारळ जाती:- नारळ लागवड आणि उत्पादन
बाणवली, प्रताप; संकरित टी × डी आणि डी × टी या जाती उत्तम आहेत.
उंच जाती
1) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात.
2) लक्षद्वीप ऑर्डिनरी - या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात, पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 टक्के असते.
3) प्रताप - नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात. नारळ लागवडीबाबत माहिती
4) फिलिपिन्स ऑर्डिनरी - ही उंच प्रकारातील जात आहे. या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन 94 ते 159 असून सरासरी 105 नारळ आहे.
ठेंगू जाती #नारळ_लागवड
या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. ठेंगू जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम असून तिच्या 100 मि.लि. पाण्यात सात ग्रॅम एवढे साखरेचे प्रमाण असते.हायब्रिड नारळ लागवड
नारळ लागवड संकरित जाती
1) टी - डी (केरासंकरा) - या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून 100 ते 160 नारळ फळे, तर सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते.
2) टी - डी (चंद्रसंकरा) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे.
♥नारळ लागवड रोपांची निवड, निगा महत्त्वाची
रोपे जूनमध्येच खरेदी करावीत व ती रोपे पिशवीत भरून ठेवावीत. रोपे नऊ ते बारा महिने वयाची असावीत. एक वर्षे वयाच्या रोपांना चार ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.
कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. रोपाची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार द्यावा.
पश्‍चिमेकडील वाऱ्याने ते हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी.
त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.
रोपांना भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते; परंतु पहिली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी; तसेच पपई यांची लागवड करावी.

♥नारळ लागवड गुणवत्तापूर्ण नारळ रोपनिर्मिती
नारळ लागवडीतून चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या रोपांची उपलब्धता महत्त्वाची ठरते. कारण नारळ बियाण्याच्या निवडीत झालेली चूक ही काही वर्षांनंतरच लक्षात येते. यासाठी दर्जेदार मातृवृक्षापासून उत्पादित झालेल्या नारळापासून रोपांची निर्मिती करावी.

ज्या बागेत अधिक उत्पादन देणाऱ्या नारळाच्या झाडांची संख्या जास्त आहे. अशाच बागेची निवड बियाण्यासाठी करावी. कारण या बागेत नारळावरील मादीफुले ही अधिक उत्पादन देणाऱ्या झाडाच्या परागकणांद्वारे तयार झाल्याने त्यांच्यातील चांगले गुण पुढील पिढीत येतात. बाग रोगमुक्त असावी, त्याचप्रमाणे किडीचा प्रादुर्भाव कमी असावा. बागेतील झाडाची योग्य वेळी आंतरमशागत करून खते व पाणीपुरवठ्याची योग्य सोय असावी.

1नारळ लागवड ) मातृवृक्षांची निवड - उत्कृष्ट नारळ रोपांच्या निर्मितीसाठी जातीनुसार उत्तम प्रतीचे मातृवृक्ष आवश्‍यक आहेत. व्यापारीदृष्ट्या उपयुक्त ठरणाऱ्या शाखीय अभिवृद्धीचे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने बियाण्यापासून रोपनिर्मिती करावी लागते. त्यासाठी मातृवृक्ष निवडताना खालील मुद्दे विचारात घेणे आवश्‍यक आहे ः
अ) नारळ लागवड उत्पन्न -
मातृवृक्ष नियमित उत्पन्न देणारा असावा. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यास वर्षाला किमान 70-80 नारळ, तर मुबलक पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणच्या मातृवृक्षापासून 100-120 नारळ मिळाले पाहिजेत. प्रति नारळ सरासरी 150 ग्रॅमपेक्षा अधिक खोबरे निघायला हवे. माडावर असलेल्या पेंडीच्या संख्येवरून येणाऱ्या उत्पन्नाची अटकळ बांधता येते.
ब) नारळ लागवडमातृवृक्षाचे वय -
मातृवृक्षाचे वय शक्‍यतो 22 वर्षे अगर त्यापेक्षा जास्त असावे. बागेतील मातृवृक्षांच्या वयाबाबत माहिती नसल्यास जे झाड चांगले उत्पादन देण्याच्या पूर्ण अवस्थेत आहेत आणि मागील चार वर्षे सातत्याने चांगले उत्पन्न देणाऱ्या मातृवृक्षाची निवड करावी. अति जुन्या झाडाचे (60 वर्षांपेक्षा जास्त) बियाणे शक्‍यतो घेऊ नये. नवीन लागवड केलेल्या बागेतील मातृवृक्षांबाबत संपूर्ण माहिती असल्यास त्या बागेतील बियाणे घेण्यास हरकत नाही.
क) नारळ लागवड पानांची संख्या आणि रचना -
मातृवृक्षावर 30 पेक्षा अधिक पाने असावीत. झावळ्यांचे देठ आखूड आणि खोडाकडे रुंद असावे. देठ खोडाला घट्ट चिकटलेले असावे. झावळ्यांचे देठ लांब आणि बारीक असल्यास अशा झावळ्या पेंडीच्या (घडाच्या) वजनाने वाकतात अगर मोडतात. त्यामुळे अशी झाडे मातृवृक्ष म्हणून निवड करू नयेत. मातृवृक्षाच्या झाडावरील पानांची रचना अशा प्रकारे असावी, की त्याला छत्रीसारखा आकार यावा. ज्या झाडाची हिरवी पाने लोंबकळत असतील अशा झाडाची निवड मातृवृक्ष म्हणून करू नये.

Комментарии

Информация по комментариям в разработке