कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहाTravel vlog-1

Описание к видео कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहाTravel vlog-1

कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहा Travel vlog-1
मी वाचलेल्या एका कथेवर हा वलॉग आहे ,एक कथा जी खूप social media वर trending मध्ये होती.मी कोकणातील अनेक कथांवर विडिओ बनवले आहेत म्हणून खूप लोकांनी मला ही कथा forward केली आणि कथा पण जरा वेगळी होती . तसं या कथेचा पाठलाग करणं तसं खूप कठीण ही जी गुहा आहे तिकडे जाण्यासाठी त्या गुहेतील लेणी पाहण्यासाठी खूप खतरनाक प्रवास करावा लागतो .
ही एक कथा आहे त्यामुळे त्याच उद्देशाने हा वलॉग बनवला गेला आहे , मनोरंजन आणि त्या वास्तू चे जतन कारण अजूनही कोणी लक्ष नाही दिले तर ही गुहा आणि ते अवशेष आठवणीत राहतील त्यामुळे त्या गुहेचे त्या लेण्यांचे संवर्धन आणि संरक्षण हाच उद्देश आहे
ही गोष्ट आहे एक कथा आहे आणि त्याच कथेचा पाठलाग मी केला आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर आणलं आहे
...
वलोग मध्ये काय आहे ...
1) सह्याद्रीचा कडा
2) 80° चढण
3) गुहा आणि गुहेतील लेणी
4)एक कथा
5) विहीर
6) एका वेगळ्या वनस्पती ओळख(काळोखात चमकणारी)
7)जंगलात बांधलेलं धरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदी जवळ समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर ऐनारी गुहा आहे. या गुहेच्या परिसरात काही वैशिष्टय़पूर्ण खोदकाम करण्यात आले आहे. याला पांडवकालीन असे म्हणण्याचा प्रघात आहे. हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात. ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव ठेवण्यात आले आहे. या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. हाच तो बकासुराचा प्रदेश.. येथे ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग लोककथांमध्ये सांगितला जातो. आज तेथे कोणतेही अवशेष नाहीत मात्र दोघांमध्ये झालेल्या भयंकर झटापटीत त्यांनी एकमेकांवर अजस्त्र वृक्ष फेकले. ते वृक्ष ज्या परिसरातून काढले गेले त्या परिसरात म्हणे आजतागायत मोठे वृक्ष पुन्हा उभे राहिले नाहीत.. पिढय़ान् पिढय़ा येथे बकासुराची आठवण जपली जाते. याला पुरावे नाहीत. मात्र परंपरा आहेत.
बकासुराला गाडीभर अन्नधान्य लागायचे. एक माणूस खायला हवा असायचा. एके दिवशी या भागातील ब्राह्मणाच्या घराची पाळी आली. त्याच्या घरातील मंडळी रडू लागली. आज घरातील एका माणसाला पाठवावे लागणार याचा त्यांना शोक होता. त्यांचा मोठमोठय़ाने आक्रोश सुरू झाला. या भागात अज्ञातवासाच्या भ्रमंतीत असणा-या पांडवांना हा आक्रोश ऐकू आला. भीमाने आवाजाचा शोध घेतला तेव्हा तो एका झोपडीसमोर पोहोचला. त्याने आक्रोशाचे कारण विचारले आणि बकासुराची हकिगत कळली. आपला एकुलता एक मुलगा आता त्याच्याकडे पाठविण्याची पाळी आहे. त्यामुळे शोक करण्यापलीकडे आमच्या हातात काही नाही असे त्या गरीब बिचा-या ब्राह्मणाने सांगितले. ग्रामस्थांवर कोसळलेले संकट भीमाला समजले, त्याने बकासुरापासून कायमची मुक्ती दिली जाईल, असे सर्वाना अभिवचन दिले. भीमाने ब्राह्मणाला शांत करत तुमच्या मुलाऐवजी आज मी गाडाभर धान्य घेऊन त्याच्या ठरलेल्या ठिकाणी जातो असे सांगितले. बकासुराच्या भेटीला तो गाडी घेऊन गेला. त्याचे अन्न स्वत:च खाऊन टाकले. यामुळे क्रोधीत झालेल्या बकासुराने भीमाला मारहाण केली. यावेळी झालेल्या जंगी कुस्तीत भीमाने बकासुराला ठार मारले. हे ज्या भागात युद्ध झाले तो भाग आजही कुस्ती पठार म्हणून चर्चेत आहे. या दोघांच्या युद्धात हे पठार झाले असावे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. भीमाने बकासुराचे शव त्याच गाडीत भरून त्याने वेशीवर आणून टाकले. गाववासीयांना बकासुराचे संकट दूर झाल्याची माहिती मिळताच गावाने भीमाचा जयघोष केला, ही कथा तुम्हाला माहीत आहे. या कथेच्या काही पाऊलखुणा आजही ऐनारीत दाखविल्या जातात. बकासुराच्या वाडय़ाचा चौथरा आजही दाखविला जातो. ज्या भागात बकासुराचे भ्रमण असायचे तो भाग आज राकसवाडा म्हणून प्रचलित आहे. या जंगल परिसराला हे नाव कसे पडले, कोणी ठेवले याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. या राकसवाडय़ात बकासुराची भीती आजही शेतक-यांना आहे. या जंगल परिसरात दाट झाडीत गुरांना घेऊन कुणी गेले अथवा या परिसरात कुणी फिरायला गेले तरीही सूर्यास्त होण्यापूर्वी घरी मागे फिरावे असा अलिखित नियम ग्रामस्थांनी आजही जपला आहे. या भागात पिढय़ान् पिढय़ा मांडवकर, भोसले, काळके, साईल ही ऐनारी गावातील मंडळी नाचणी-वरीची शेती करतात. सध्या या डोंगरातील बराच भाग अभयारण्यासाठी वनविभागाने आपल्या ताब्यात घेतला असला तरी या लगत असणा-या खासगी जमिनी राकसवाडय़ाच्या काही क्षेत्रात येतात. बकासुराचा या भागात संचार असायचा. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतिकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात. त्यावर छोटय़ा छोटय़ा भाताच्या गोण्या आणि शिजवलेला भात ठेवतात. ही बैलगाडी या भागात घेऊन जात हा?भात राकसवाडय़ात फेकला जातो. शेतीला सुरुवात करण्यापूर्वी?ही परंपरा पूर्ण केली जाते. काही वर्षापर्यंत पिठाचे बाहुले करून बकासुराच्या नावाने ते तोडले जायचे आज ही परंपरा नव्या पिढीने बाजूला केली आहे. या धान्याच्या रूपाने का होईना जंगली पशू-पक्षांना अन्न मिळते हेही विशेष..

My vlogging setup -

Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135

Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs

Mic1 - https://amzn.to/3kONhz3

Mic 2 - https://amzn.to/3bibBpU

Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n

Tripod - https://amzn.to/2O5aRf1

follow us -

Instagram
  / sanchitthakurvlogs__  
Facebook -   / sanchitthakurvlogs  


#bakasur #बकासुर

Комментарии

Информация по комментариям в разработке