#chaturmasspecial #चातुर्मासात करावयाची 21प्रभावी व्रते #blessings #astrology
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
#shivmahapuran
#swamisamarth
#festival
#swamisamarth seva
#chaturmasspecial
#vrat
#chaturmaskatha
👉मुले हट्टीपणा करत असतील तर हा विडिओ पहा 👇
* • #मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी सेवा #shi...
👉आर्थिक प्रगतीसाठी स्वामींचा असा अभिषेक करा 👇 • #swamisamarth#आर्थिक प्रगतीसाठी स्वामीमहार...
#_चातुर्मासातील व्रताचरण_*
चातुर्मासांत स्तोत्रपठण, सद्ग्रंथलेखनसेवा याबरोबरच दानाचे विशेष महत्त्व आहे. त्याची थोडी माहिती.......
१) #देवासमोर #हळदी कुंकाचे स्वस्तिक काढावे .. उद्यापनाला हळदीकुंकू करंडा सुवासिनीला देऊ शकता .
२)दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी, याला नित्यदान म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेऊन सत्पात्री किंवा मंदिरात दान द्यावे #.उद्यापनाला #जेवायला बोलावावे किंवा शिधा द्यावा.
३)पृथ्वीपूजा.... रोज देवघरात जमिनीला पाणी लावून, पुसून स्वस्तिक ,लक्ष्मीपाऊल काढून ,हळदीकुंकू ,माळा, वस्त्र वाहून दूधसाखर दाखवून ओटी भरावी . उद्यापनाला आईला साडी नेसवावी .. पृथ्वी म्हणजे आई मानून आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे , 'समुद्रवसने देवी' श्लोक म्हणत पूजा करावी.
४)तुळशीमध्ये #बाळकृष्ण ठेऊन जोडीने पूजा करावी......यांस दाम्पत्यपूजा म्हणतात.दररोज करा किंवा दर द्वादशीस #श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेऊन दान द्यावे .उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन मेहूण जेवू घालू शकता .
५)पंचामृताने श्रीकृष्णाला रोज पूजा- अभिषेक करावी किंवा दर द्वादाशीला पंचामृत घालून पूजा करून मध, तूप, #दूध,दही, साखर दान करावे किंवा लोण्यात कृष्ण ठेऊन पूजा करून लोणी दान करावे .
६)दर द्वादशीला सुवासिनीला विडा, दक्षिणा , दूध ,गजरा देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या किंवा दर द्वादशीला साडी / सूपवाण द्यावे.
७)तुळशी अलंकारिक पूजा .. दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार( नथ, जोडवे, बांगड्या, मंगळसूत्र) घालून #ओटी भरावी , पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे.
८) दर द्वादशीस मेहूण जेवू घालू शकता .. उद्यापनाला चातुर्मासातील सर्व द्वादशांचे( नऊ) मेहूण एकत्र जेवायला बोलावून यथानुशक्ती वस्त्र देऊन ओटी भरणे .
९)दर एकादशीला देवाला १०८,१००८ तुळशी अर्चन करू
शकता .
१०) #पंचामृत चातुर्मास..... दर महिना पंचामृतातील एक सोडायचे नंतर ते दान करायचे.
११)लक्ष पुष्पार्चन.... पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष फुले अर्पण करू शकता.
१२) रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा करा गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गाईची करावी . गोग्रास द्यावे . उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावे.
१३)दर द्वादाशीला देवासमोर शिधा काढून ठेवावे व संकल्प करून सत्पात्री द्यावे.
१४)नित्य देवदर्शन..... #मंदिरात जाऊन दर्शन, प्रदक्षिणा नियम करू शकता .
१५)दीपदान... .दररोज तुपाचा दिवा लावायचा .दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयी दान करणे, मंदिरात तेल दान देणे .
१६) लक्ष वाती करणे ,लावणे किंवा देणे ,लक्ष ओटी भरणे ,लक्ष नमस्कार ,किंवा लक्ष जप करणे असे संकल्प करू शकता .
१७)दररोज तुळशीला प्रदक्षिणा... (११, २१, किंवा १०८ असे घालू शकता.
१८) तुळशी पूजा तबकदान ..म्हणजे तुळशीपूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्यावे. हे दर द्वादशी किंवा एकदा करू शकता .(निरंजन ,कलश, करंडा, पूजेचे ताम्हण वगैरे .)
१९) गुप्तदान ... द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती , पोळे , सोने , चांदी किंवा पैसे लपवून ( गुप्त ठेवून) संकल्प करून, देवाला दाखवून दान द्यावे .देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये.
२१) सुवासिनीला साडी किंवा अलंकारादि वस्तू इत्यादी दान करू शकतो .
मला माहिती असलेले,वाचलेले
व्रत लिहून पाठवलanW
हे.ज्याला शक्य आहे त्यांनी संकल्प सोडून यथाशक्ती हे व्रताचरण
भगवत्प्रीत्यर्थ करावे. 🙏🙏🙏🙏🙏
Информация по комментариям в разработке