Congress Survey मध्ये ठाकरे गटाला फक्त 32 जागा, Vidhansabha मध्ये Thackeray बॅकफूटला जाऊ शकतात ?

Описание к видео Congress Survey मध्ये ठाकरे गटाला फक्त 32 जागा, Vidhansabha मध्ये Thackeray बॅकफूटला जाऊ शकतात ?

#BolBhidu #UddhavThackeray #VidhanSabhaElection2024

लोकसभा निवडणुकीत १३ जागांवर विजय मिळवत काँग्रेस महाविकास आघाडीतला त्याचबरोबर राज्यातलादेखील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर ९ जागा मिळवत ठाकरे गट दुसऱ्या स्थानावर होता. मात्र सर्वाधिक म्हणजेच २१ जागांवर लढणाऱ्या ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत म्हणावं असं यश मिळवता आलं नव्हतं. तर दुसरीकडे १० जागा लढवणाऱ्या शरद पवारांनी ८ जागांवर विजयी होत मोठं यश मिळवलं होतं, आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नुकताच एक अंतर्गत सर्वे करण्यात आलाय. या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक म्हणजे ८५ जागा, शरद पवार गटाला ५५ ते ६० जागा आणि ठाकरे गटाला ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीलाही निकाल लागू शकतो असे अंदाज या सर्वेमधून व्यक्त करण्यात आले आहेत. एकूणच ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही फार मोठ यश मिळताना दिसत नाहीये. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट बॅकफूटला जाऊ शकतो का ? अशी कोणती कारणं आहेत, ज्यामुळं ठाकरे गटाला नुकसान सहन करावं लागू शकतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке