Kasara ghat | ghatandevi | camel valley | igatpuri

Описание к видео Kasara ghat | ghatandevi | camel valley | igatpuri

Kasara ghat | ghatandevi | camel valley | igatpuri



मुंबई नाशिक महामार्गावर जात असताना कसारा घाटात उजव्या बाजूला दिसणारी विहीर सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. कसारा घाटाला पूर्वी थळ घाट असे म्हणत . पूर्वी तो व्यापारी मार्ग असल्यामुळे यात्रेकरूंची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ही विहीर बांधून घेतली. विहिरीत पालापाचोळा किंवा कुठला प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये म्हणून याची रचना घुमुटाकृती आकाराची केली आहे. या विहिरीत 12 महिने पाणी असते. आजूबाजूच्या गावातील काहिक लोक पिण्यासाठी अजूनही या विहिरीचे पाणी वापरतात.


घाटनदेवी:-

कसारा घाट संपल्यावर घाटनदेवीचे मंदिर लागते अस म्हणतात की इथूनच इगतपुरी शहराची हद्द सुरू होते. 'श्री दुर्गा-सप्तशती' मध्ये घाटनदेवीचा उल्लेख आढळतो तो म्हणजे शैलपुत्री म्हणून. वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे देवी निघाली असताना देवीने याच ठिकाणी विश्रांती घेतलेली व इथला परिसर आवडल्यामुळे देवी इथेच कायमची राहिली असे सांगितले जाते. शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते तेव्हा त्यांनी यथासांग व शास्रोक्त पूजा अर्चा करून देवीचे दर्शन घेतले अशी इतिहासात नोंद आहे.


उंट दरी:-

घाटनदेवीच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला उंट दरी आहे. कल्याणचा खजिना लुटून याच दरीत उंट लोटले म्हणून या दरीला उंट दरी म्हटले जाते. तसेच भातसा नदीचा उगम ही ह्याच उंट दरीतून होतो.


------------------------------------------------------------

Song: Fredji - Blue Sky (Vlog No Copyright Music) Music provided by Vlog No Copyright Music. Video Link:    • Fredji - Blue Sky (Vlog No Copyright ...  

-------------------------------------------------------------



follow me on

instagram :- https://instagram.com/omkar_patil_333...






Thank you for watching............

Комментарии

Информация по комментариям в разработке