Uddhav Thackeray आणि Congress मध्ये वाद, पण Sharad Pawar यांची तिरकी चाल, नेमकी खेळी काय ?

Описание к видео Uddhav Thackeray आणि Congress मध्ये वाद, पण Sharad Pawar यांची तिरकी चाल, नेमकी खेळी काय ?

#BolBhidu #MahavikasAghadiFormula #SharadPawar

गणपती विसर्जनानंतर जागावाटपाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय. महायुतीतले पक्ष स्ट्राइक रेटच्या बळावर जागा मागत आहेत. तर महाविकास आघाडीतले ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदावरून वाद घालत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असताना, या सगळ्यात शरद पवार मात्र नामानिराळे दिसतायंत. त्यामुळे लोकसभेतल्या यशानंतर शरद पवार गटानं लगेचंच राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढली. पण त्यावेळी पवारांकडे विधानसभा लढवण्यासाठी मातब्बर नेते आणि उमेदवार नव्हते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक महत्वाचे आणि पहिल्या फळीतले नेते अजित पवारांबरोबर गेले.

त्यामुळे विधानसभेसाठी शरद पवारांनी नवीन उमेदवारांचा शोध सुरू केला. यात त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे अजित पवार गटाच्या विरोधकांना बळ देण्यास सुरुवात केली. पवारांनी दुसरी गोष्ट केली ती म्हणजे आपल्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घ्यायला सुरुवात केली. जे सहकारी राजकारणातून साईड लाईन झाले होते, त्यांना पुन्हा राजकारणात आणलं. थोडक्यात सांगायचं झालं तर महाविकास आघाडी आणि महायुतीतले पक्ष जागावाटप आणि मुख्यमंत्री पदावरून वाद करत असताना, शरद पवार मात्र तिरकी चाल खेळत सगळ्यात पुढे असल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणूका अवघ्या महिन्याभरावर आल्यात, अशात शरद पवार नेमकी काय खेळी करत आहेत? राजकीय पटलावरची त्यांची तिरकी चाल कशी आहे? पाहुयात या व्हिडिओमध्ये.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке