Maharashtra Retreating Monsoon: महाराष्ट्रात मान्सून संपला ? परतीचा पाऊस कधी सुरु होणार ?

Описание к видео Maharashtra Retreating Monsoon: महाराष्ट्रात मान्सून संपला ? परतीचा पाऊस कधी सुरु होणार ?

#BolBhidu #MaharashtraRetreatingMonsoon #RetreatingMonsoonSeason

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानासहित काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रीय होणार, असा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने म्हटल्याप्रमाणे 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात देखील एक नवीन अपडेट दिली आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका कधी सुरू होणार या संदर्भात हवामान खात्याने माहिती दिली आहे. 2020 पूर्वी सप्टेंबरमध्ये परतीचा मान्सून सुरू होत असल्याचं समजलं जायचं. मात्र 2020 पासून भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सर्वसाधारण तारीख 17 सप्टेंबर निश्चित केली आहे. यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास यापेक्षा अधिक लांबला आहे. परतीच्या पावसाला अजूनही पोषक परिस्थिती नाही. मग मान्सून संपला का, किती दिवस पाऊस आहे, परतीचा पाऊस कधी सुरु होणार याची सविस्तर माहिती घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке