मी मामा झालो Mi Mama Zalo 😍 | बहिणीच्या घरचा पाहुणचार - Wadala, Mumbai (मुंबई)

Описание к видео मी मामा झालो Mi Mama Zalo 😍 | बहिणीच्या घरचा पाहुणचार - Wadala, Mumbai (मुंबई)

[10/18, 9:18 PM] Satish Ratate: मी मामा झालो Mi Mama Zalo 😍 | बहिणीच्या घरचा पाहुणचार - Wadala, Mumbai (मुंबई)
[10/19, 11:58 AM] Satish Ratate: मी मामा झालो Mi Mama Zalo 😍 | बहिणीच्या घरचा पाहुणचार - Wadala, Mumbai (मुंबई) मित्रांनो मी आणि माझा भाऊ मुंबईला आलो आहोत तर म्हटलं बरेच दिवस झाले म्हणजे जवळपास 5 महिने होऊन गेले आम्ही आमच्या बहिणीच्या घरी गेलो नव्हतो. कारण सुद्धा तसेच होते बाहेर असणाऱ्या परिस्थितीमुळे कुठे जाता येत नव्हते. आज बऱ्याच दिवसांनी बहिणीकडे मुंबईमध्ये वडाळा आणि घोडपदेव येथे गेलो. मित्रांनो मी पुन्हा एकदा माझा झालोय. होय, माझी छोटी बहीण जिला पुत्र रत्नाचा लाभ झाला. माझ्या दोन बहिणी, माझ्या पेक्षा दोघीपण लहान आहेत. मोठीला एक मुलगा आहे त्याचं नाव आर्यन त्याला आम्ही आरु बोलतो. जाम हुशार आहे आरु, कलाकारी खूप आहे त्याच्यात. मोठी बहीण वडाळा येथे राहते. आम्ही पनवेल मधून सायंकाळी निघालो. प्रथम आम्ही माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी वडाळा येथे गेलो. रात्री तिकडे वस्ती केली. #MiMamaZalo #BahinichaPahunchar #WadalaMumbai #sforsatish
बहिणीने खूप छान पाहुणचार केला. अतिशय मायेने, प्रेमाने जेवू घातलं. आरु सोबत खूप धमाल केली. सकाळी दुसऱ्या दिवशी नाश्ता, दुपारचं जेवण करून आम्ही तिघे भावंडं सोबत आरु, आमचे भावजी मिळून छोट्या बहिणीच्या घरी बाळाला बघायला निघालो. सोबत जाताना खाऊ, बाळाला कपडे, बक्षीस घेतले. आईने गावावरून बहिणीला तांदूळ पाठवले होते. बहिणीचा बाळ खूप हुशार आहे. त्याला डोस दिला होता म्हणून गाढ झोपला होता. थोड्या वेळानंतर आम्हाला त्याने रडून सुद्धा दाखवले. त्याचे नाव ते अद्विक ठेवणार आहेत. चहा नाश्ता केला आणि गम्मत अशी झाली की बाबूला कपडे घेतलेल्या त्या सर्व पिशव्या गाडीमध्ये राहून गेल्या आणि ती गाडी ठाण्याला गेली. गाडीला येता येता उशीर झाला. आम्ही भेट देऊन निघालो कारण आम्हाला पुन्हा पनवेल गाठायचं होतं. मोठ्या बहिणीला निरोप देऊन आम्ही एसटीने पनवेल येथे घरी पोहोचलो. पण हा प्रवास मजेशीर होता. ते सुंदर क्षण कायम स्मरणात राहतील असे होते. हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं ते कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !

संपर्कात राहण्यासाठी मला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке