Sharad Pawar, Vijaysinh Mohite Patil सोलापूर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करणार? ११ विधानसभेची समीकरणं

Описание к видео Sharad Pawar, Vijaysinh Mohite Patil सोलापूर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करणार? ११ विधानसभेची समीकरणं

#BolBhidu #SharadPawar #Solapur

एकेकाळी सोलापूरवर वचक असलेले मोहिते पाटील घराणे गेल्या काही वर्षांपासून राजकीय पटलावर शेवटच्या रांगेत फेकल्याचे चित्र होतं. २००९ ते २०१९ या दशकात मोहिते पाटलांना अकलूज सोडून बाहेर काही करता आले नाही. यातून त्यांनी भाजपसोबत समझोता करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपनेही त्यांना आधी माढ्यातून रणजित निंबाळकरांना निवडून आणण्याची आणि नंतर माळशिरसमधून राम सातपुतेंची उमेदवारी देऊन पक्ष सांगेल तेच करावे लागले, असा संदेश दिला. तोच प्रत्यय २०२४ च्या लोकसभेतही त्यांना आला. आता डोक्यावरून पाणी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपपासून फारकत घेत तुतारी हाती घेतली आणि भाजपला पवारांच्या साथीने धोबीपछाड दिला..आता शरद पवारांनाही विधानसभेसाठी राज्यात सत्ता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालु केलेत यातून कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून ३-४ जागांची तुतारीसाठी आणि मविआसाठी १० च्या १० जागांची फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.

तशीच फिल्डिंग आता सोलापूरात लावण्यासाठी पवार आणि मोहिते पाटील सरसावले आहे..लोकसभेनंतर आता विधानसभेतही सोलापूरातून भाजप आणि महायुतीला शह देऊन करून मोहिते पाटील घराणं पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील आपलं वर्चस्व पुन्हा मिळवू पाहत आहे. तसेच विरोधात गेलेल्या नेत्यांनाही धडा शिकवण्याचा विडा मोहिते पाटील यांनी उचलला आहे. मात्र त्यांची जिल्ह्यात खरंच तेवढी ताकत आहे का, की लोकसभेप्रमाणे शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशिलकुमार शिंदे हे त्रिकूटच जिल्ह्यात महाविकास आघाडीला तारणार का ? हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке