सहानुभूतीची आम्हाला गरज नाही Ft. Anagha Modak | Woman Ki Baat | Aarpaar Marathi

Описание к видео सहानुभूतीची आम्हाला गरज नाही Ft. Anagha Modak | Woman Ki Baat | Aarpaar Marathi

#AnaghaModak #आरपार

व्यंग कोणात नसतात? प्रत्येकात असतात. अगदी चित्राला सुद्धा व्यंग असतातच की. फक्त काही व्यंग दिसतात, काही दिसत नाहीत. आपल्या व्यंगाला स्वीकारून पुढे जातो तो यशस्वी. हे म्हणणं सोपं आहे, पण स्वीकारणं तेवढंच सोपं आहे का? पण अनघाने मात्र ते करुन दाखवलंय. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा ते शिकावं आपण सगळ्यांनीच अनघाकडून.

२५ व्या कोवळ्या वर्षी जेव्हा आयुष्य एका वेगळ्याच टप्प्यावर असतं तेव्हा, ते तसं न राहता कुठल्यातरी अनपेक्षित संघर्षाचा भाग होऊन बसतं. पण मग तेव्हा आपण कसे वागतो, कसे बोलतो, परिस्थितीशी दोन हात कसे करतो, किती हसतो, किती रडतो या सगळ्याबद्दल अगदी मनमोकळेपणाने अनघाने आपल्याशी साधलेला संवाद म्हणजेच आमच्या वूमन की बातच्या प्रवासाचं खऱ्या अर्थाने सार्थक आहे. बाकी, ही मुलाखत शेवटपर्यंत पहा हे वेगळं सांगायला नकोच, नाही का..

Комментарии

Информация по комментариям в разработке