श्रीक्षेत्र चंदनपुरी Khandoba Mhalsa Banai - Khanderav Mandir

Описание к видео श्रीक्षेत्र चंदनपुरी Khandoba Mhalsa Banai - Khanderav Mandir

#Banu #Khandoba #Khanderaya
बानूची चंदनपुरी 
जयमल्हार.....श्रीक्षेत्र जेजुरीच्या कुलस्वामी खंडोबा कुलाचार आणि पूजा भाविक भक्तांना घरबसल्या युट्युबच्या माध्यमातून पाहता याव्यात म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
जेजुरीच्या कुलस्वामी खंडोबाची रंकापासून रावांपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये पूजा केली जाते. पौराणिक कथांसोबत अनेक लोककथा खंडोबा दैवतासोबत जोडल्या गेल्याने खऱ्या अर्थाने खंडोबा हे लोकप्रिय लोकदैवत आहे, त्यामुळे विविध भागांमध्ये आपणांस मोठमोठी खंडोबाची मंदिरे पाहावयास मिळतात. यापैकीच एक असलेले श्रीक्षेत्र चंदनपुरीची माहिती या चित्रफितीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याजवळ मुंबई आग्रा मार्गावरील चंदनपुरी फाट्या पासून ३ किमी अंतरावर गिरणा नदीकाठी श्रीखंडोबा मंदिर आहे. मंदिरास दगडी कोट असून पूर्व व पश्चिम बाजूने दरवाजे आहेत. मंदिराचे पुर्वद्वार प्रमुख असून या द्वारा बाहेर दीपमाळ आहे.
पूर्व दरवाजाने आत गेल्यावर पूर्वाभिमुख मुख्य मंदिर दिसते, मंदिराच्या दोन्ही बाजूस साध्या बांधणीच्या दोन दीपमाळा आहेत.मुख्य मंदिराची रचना, मंडप व गर्भगृह अशी आहे. मंडपावर घुमटाकार असून गर्भगृहावर कमी उंचीचा कळस आहे. 
मंडपात जाण्यासाठी पूर्व द्वारास काही पायऱ्या आहेत हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे येथील नागरिक सांगतात परंतु याठिकाणी तसा कुठलाही शिलालेख अथवा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. मंदिराच्या बांधकामामध्ये कलाकुसर कुठेही आढळून येत नाही. पूर्वाभिमुख गर्भगृहात समोरील एका कोनाड्यात खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या संगमरवरी उभ्या मुर्ती आहेत. पूर्वीच्या मुर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या व त्या भग्न झाल्याने या नवीन मूर्ती बसविण्यात आल्या.या मुर्ती समोर शिवलिगं आहे... श्रीक्षेत्र चंदनपुरीची महती जागरणामध्ये सांगितल्या जाणाऱ्या अनेक लोककथांमधून ऐकायला मिळते. श्रीखंडोबाला दोन पत्नी आहेत त्यापैकी म्हाळसा वाणी समाजातील तर बाणाई धनगर कन्या आहे. प्रथम पत्नी म्हाळसा नेवासा येथील आहे तिच्यासोबत पाली येथे पौष शुद्ध त्रयोदशीला विवाह झाला. एकदा सारीपाटाच्या खेळामध्ये पराभूत झाल्यानंतर श्रीखंडोबाने अज्ञातवास स्वीकारला आणि बाणाईचे सौदर्याला भूलून गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या चंदनपुरी येथील धनगरवाड्यावर जाऊन बानूच्या घरी चाकरी करू लागला व आपल्या दैवी शक्तीने प्रेमात गुंतवून श्रावण शुद्ध पौर्णिमेला नळदुर्ग येथे विवाह केला. चंदनपुरी मध्ये बाणाईच्या घरी खंडोबाचे वास्तव्य असल्याने येथे मंदिर आहे.
मुख्य मंदिराचे मागील पश्चिम बाजूस असलेल्या दरवाज्याचा वापर जास्त होत असतो.
मंदिराच्या उत्तर बाजुस ओवऱ्यांमध्ये स्थापित गणेश मूर्ती त्यासमोर शिवलिंग व नंदी आहे.
चंदनपुरी गावाच्या पश्चिमेस एका उंचवट्यावर बाणाई चे छोटेसे मंदिर आहे मंदिरातील मुर्ती संगमरवरी आहे, पौष पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते उत्सव मुर्तीचा पालखी सोहळा या दिवशी असतो. पुढे दहा दिवस यात्रेची गर्दी असते.श्री.अण्णाश्री उपाध्ये गुरुजींच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून भाविकांना विविध पूजा, आरती आणि कुलाचार अनुभवायला मिळतील. तसेच www.jejuri.in या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
तुम्हाला आमची ही सेवा आवडली असेल तर LIKE करा, आपल्या नातेवाईक मित्रपरिवारासोबत SHARE शेअर करा आणि नवनवीन व्हिडीओ तुम्हाला त्वरित मिळण्यासाठी SUBSCRIBE करून बेल आयकॉन क्लिक करा.

#Jejuri, #Khandoba, #Khanderaya, #Davana, #Dawana, #Puja, #Shiralsheth #Shriyal # #Kadepathar, #Malhar, #Aarti #Mhalsakant, #Martand, # Bhairav,. #Mallanna, #Mallappa, #Mailarling, #Shankar #Mahdev, #Mhalsa, #Ghode_Uddan, #Steps, #Karha, #karhepathar, #Purandar, #Valley, #Talav, #Sadanand, #Yelkot, #Mandir, #Temple, #Jejurgad, #Upadhye_Guruji, #Jejurgad, #Mangsooli, #Mangsuli, #DevarGudda, #Guddapur, #Dharwad, #komaruvelli, #bidar, #Manikprabhu, #Satare, #Korthan, #Dhamani, #Mailar, #Dawadi #Nimgaon, #NimgaonDawadi, #JayMalhar, #Delawadi, #Shegud, #Naldurga #Gurupournima, #Chaitra #श्रावण #सगनभाऊ #होनाजीबाळा #सौराष्ट्र #सोमनाथ #बद्रीनाथ #केदार #भूपाळी #शाहीर #भूप राग #पहाटे #जेजुरी #खंडोबा #म्हाळसकांत #मल्हार #मल्हारी #मार्तंड #जेजुरगड #खंडेराया #दवणा #पूजा #आरती #रामदास #स्वामी #श्रीयाळ #षष्ठी #शिराळशेठ #श्रीयाळश्रेष्ठ #बानू, #बानूबाई, #बाणाई,#धनगर,#वाडा, #नाशिक, #खंडेराव, #चंदनपुरी,

Комментарии

Информация по комментариям в разработке