मन चंगा तो कठौती में गंगा । ह.भ.प. अवंतिका ताई टोळे । Kirtanvishwa | Sant Rohidas Maharaj

Описание к видео मन चंगा तो कठौती में गंगा । ह.भ.प. अवंतिका ताई टोळे । Kirtanvishwa | Sant Rohidas Maharaj

मन चंगा तो कठौती में गंगा
दासगणू संप्रदायी कीर्तन । Avantika Tai Tole

परमार्थ साधण्यासाठी मनुष्य जन्मभर खूप कष्ट करतो. पूर्व पुण्याईने, आई-वडिलांच्या कृपेने, बालपणी त्याला उपासनेची गोडी लागते. मग जपजाप्य, नामस्मरण, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, यज्ञ-याग सारे सारे माणूस करतो. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर पोचता क्षणी त्याची विवेकबुद्धी जागी होते आणि तो आयुष्यभर केलेल्या या सर्व अध्यात्मिक खटपटींचा हिशोब मांडायला लागतो. त्याला जाणवते की ज्या प्रमाणात जेवढी खटपट केली त्या प्रमाणात तेवढी प्रगती नाही साधता आली. एवढ्या खटपटी नंतर सुद्धा आपली अध्यात्मिक प्रगती का झाली नाही ? परमार्थ मार्गातील प्रगती का साधली गेली नाही ? याचा विचार जे कोणी विवेकी साधक करत असतील तर त्यांच्या साठी मार्गदर्शन करणारे अनेक अभंग श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेले आहेत. त्यातील एका अभंगावर आपल्या दासगणू सांप्रदायिक कीर्तनातून निरूपण करणार आहेत सौ हरी भक्त परायण अवंतिकाबाई टोळे. या निरुपणाबरोबरच दासगणू महाराज यांनी रचलेल्या श्री संत रोहिदास महाराजांच्या चरित्राचे गायन, त्या आपल्या सम्मुख सादर करणार आहेत.

Dasganu Sampraday Kirtan
Sant Rohidas Charitra

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa #marathikirtan

Комментарии

Информация по комментариям в разработке