देवाने दिलेल्या भांडवलाचा सदुपयोग । ह.भ.प अवंतिका ताई टोळे । KirtanVishwa | Dasganu Marathi Kirtan

Описание к видео देवाने दिलेल्या भांडवलाचा सदुपयोग । ह.भ.प अवंतिका ताई टोळे । KirtanVishwa | Dasganu Marathi Kirtan

देवाने दिलेल्या भांडवलाचा सदुपयोग । ह.भ.प अवंतिका ताई टोळे
Dasganu Kirtan

श्रीमंत आईबापांनी आपल्या लेकराला शिकवून, सवरून शहाणा केला आणि व्यापारासाठी थोडं भांडवल देऊन, एक वर्षासाठी परदेशी पाठवलं. जर शहाणा पोरगा असेल तर परदेशी जाऊन जरा निवास भोजनाची सोय लागली की लगेच व्यापार सुरू करेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने अनुभवी लोकांच्या भेटीगाठी घेईल, मार्गदर्शन मिळवेल. एखादा बिजनेस सुरू करेल. पण जो आळशी असेल तो म्हणेल काय घाई आहे ? एक वर्ष संपायला खूप वेळ आहे. तोवर जरा चैन करून घेऊ. मग त्या चैनीतच मन रमायला लागते आणि भांडवल संपून जाते. असे वागल्याबद्दल, आपल्या माय बापाला किती दुःख होत असेल ? असेच आपल्या आळशीपणाने आपण देवाला दुखी तर करत नाही ना ? आपल्या चंगळवादी विचारांनी-आचारांनी देवाला, आपल्या मातापित्याला पश्चाताप करायची वेळ तर आणत नाही ना ? हा विचार प्रत्येक सश्रद्ध माणसाने केला पाहिजे. हा महत्त्वपूर्ण विचार आपल्या समोर विशद करीत आहेत, सौ हरी भक्त परायण अवंतिकाताई टोळे त्यांच्या दासगणू पठडीतील कीर्तना मधून. या निरुपणा बरोबरच सुप्रसिद्ध संत दामाजी पंत यांची कथा देखील त्या आपल्या कीर्तनातून रंगवणार आहेत.

Avantika Tai Tole
Sant Damaji Pant

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa #marathikirtan

Комментарии

Информация по комментариям в разработке