UP Hathras Stampede: ज्याच्या सत्संगमध्ये शेकडो जणांचे प्राण गेले, तो Bhole Baba नक्की आहे तरी कोण ?

Описание к видео UP Hathras Stampede: ज्याच्या सत्संगमध्ये शेकडो जणांचे प्राण गेले, तो Bhole Baba नक्की आहे तरी कोण ?

#BolBhidu #HathrasStampedeNews #BholeBabaSakarHari

२ जुलैच्या दुपारी उत्तर प्रदेशच्या हाथरस मधल्या फुलरई गावात भोले बाबा साकार हरी या बाबाचा सत्संग सुरू होता. बाबा लोकांना प्रवचन देत होता आणि जवळपास २० हजार भाविक त्याचा उपदेश ऐकत होते. पण हा सत्संग संपल्यानंतर मोठी चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत आतापर्यंत १२२ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. या घटनेनंतर उत्तर प्रदेशसह संपूर्ण देश हादरलाय. मृतांमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जायंत.

या दुर्घटनेत जखमींची संख्या १५० पेक्षा जास्त असून मृतांचा संख्या वाढण्याची शक्यता आहे. चेंगराचेंगरीत लोक एकमेकांच्या अंगावर पडत होते, चिरडले जात होते, तिथे लोकांचा एकच आक्रोश ऐकायला येत होता. आणि ज्या बाबाच्या चरणांची धूळ घेण्यासाठी इतके लोक जमले होते तो बाबा मात्र आपल्या या घटनेनंतर फरार झालाय. इतर बाबा आणि अध्यात्मिक गुरुंप्रमाणे फारसा प्रसिद्धीझोतात नसलेला हा बाबा कोण, कुठून आला आणि आधी पोलिस खात्यात असणारा हा माणूस उपदेश देणारा बाबा कसा झाला, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке