Pravin Mane यांची Sharad Pawar गटात एन्ट्री पण खरा डाव Harshwardhan Patil यांच्यासाठी टाकला का ?

Описание к видео Pravin Mane यांची Sharad Pawar गटात एन्ट्री पण खरा डाव Harshwardhan Patil यांच्यासाठी टाकला का ?

#BolBhidu #PravinManeJoinsSharadPawar #MaharashtraPolitics

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधल्या जिल्हाध्यक्षासह २५ माजी नगरसेवक आणि २ माजी महापौरांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर २७ जुलैला विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार गटाची वाट धरली. आता अजित पवारांना इंदापूरात देखील दणका बसला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रवीण मानेंनी सुरुवातीला सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता. पण त्यांना आपल्या बाजुने वळवण्यासाठी फडणवीस आणि अजित पवारांनी जोरदार फिल्डींग लावली होती. दोन्ही नेत्यांनी प्रवीण मानेंच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली होती. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना चकवा देऊन त्यांनी तुतारी हाती घेतली आहे. या पक्षप्रवेशामुळे महायुतीच्या गटात टेन्शन वाढल्याचं बोललं जातं असलं तरी, या सगळ्या खेळीमागं हर्षवर्धन पाटील हेच असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या सांगण्यावरूनच प्रवीण मानेंची शरद पवार गटात एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. प्रवीण माने हे इंदापूरात शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात, अशा देखील चर्चा आहेत. पण या सगळ्यामागे नेमकं काय शिजतंय? प्रवीण मानेंच्या पक्षप्रवेशामागं हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा नेमका डाव काय? समजून घेऊयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке