कसे आहे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण? काय आहेत याची उद्दिष्ट्ये व वैशिष्ट्ये? समजून सांगणारा व्हिडिओ.

Описание к видео कसे आहे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण? काय आहेत याची उद्दिष्ट्ये व वैशिष्ट्ये? समजून सांगणारा व्हिडिओ.

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अस्तित्वात आले, त्याला २९ जुलै २०२३ रोजी तीन वर्षे पूर्ण होताहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासन २४ ते २९ जुलै २०२३ या कालावधीत 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह' साजरा करीत आहे. यामध्ये राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचाही सहभाग आहे.
शिवाजी विद्यापीठानेही 'NEP 2020 WEEK@SUK' हा उपक्रम आयोजित केला असून त्याअंतर्गत अनेक कार्यक्रम होत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सर्वसामान्य घटकांसह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडवून आणण्याच्या दृष्टीने एक विशेष ऑनलाईन परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादामध्ये शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन हे सहभागी झाले आहेत. जनसंपर्क अधिकारी तथा 'शिव-वार्ता'चे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे बारकावे समजावून देण्याचा हा शिवाजी विद्यापीठाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке