दौलताबाद किला | देवगिरी किला | Daulatabad Fort | Devgiri Fort|

Описание к видео दौलताबाद किला | देवगिरी किला | Daulatabad Fort | Devgiri Fort|

#killa

#viral

#daulatabadkilla

#daulatabadkilla

#devgirifort

#devgiriforthistory

#Viral



दौलताबाद किला | देवगिरी किला | Daulatabad Fort | Devgiri Fort | #fort 🚩


पुरातन देवगिरी. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहराच्या वायव्येस सु. १३ किमी. अंतरावर वेरूळ रस्त्यावर हे स्थळ आहे. इतर डोंगररांगेपासून अलग असलेल्या सु. २०० मी. उंच टेकडीवर बांधलेला किल्ला, हे या स्थळाचे वैशिष्ट्य. तसेच येथे जैन, हिंदू व मुस्लीम धर्मियांच्या वावराचेही पुरातत्त्वीय अवशेष मिळतात.


बारादारी, दौलताबाद.
दौलताबादच्या समृद्ध आणि वैभवशाली इतिहासाचा प्रारंभ इ. स. ११९१ मध्ये झाला. त्या वर्षी पाचवा भिल्लम या यादव राजाने देवगिरी ही त्याची राजधानी केली. तेव्हापासून ते बहमनी कालखंडापर्यंत देवगिरी उर्फ दौलताबाद हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. दौलताबादला टेकडीच्या माथ्यावर एक वाडा, मंदिर आणि मशिदीसारखी छोटी इमारत आहे. टेकडीच्या पूर्वेस सपाटीवर महाकोट म्हणून ओळखला जाणारा एक मोठा किल्ला आहे. त्याच्या आतमध्ये भारतमाता मंदिर किंवा जामी मशीद, चांद मिनार, अनेक मशिदी आणि उद्ध्वस्त घरांचे अवशेष आहेत. महाकोटामध्येच परंतु टेकडीच्या पायथ्यापाशी आणखी एक कोट असून त्याला कालाकोट असे म्हणतात. या छोट्या किल्ल्यात काही वाड्यांचे आणि दालनांच्या इमारतींचे अवशेष आहेत. महाकोटच्या दक्षिणेला व पूर्वेला पसरलेले अंबरकोट हे गाव आहे. अंबरकोटच्या उत्तर भागात, संपूर्ण महाकोट आणि कालाकोटमध्ये पाणीपुरवठ्याची सुनियोजित व्यवस्था होती. टेकडीच्या ईशान्येला दरीत बंधारा घालून अडवलेले पाणी उघड्या तसेच भूमिगत नाल्यांद्वारे आणले जाई आणि सार्वजनिक कुंड तसेच ते विविध इमारतींना पुरवले जात असे. अंबरकोटच्या पश्चिमेकडील भागात नगरतळे या नावाने ओळखले जाणारे तळे असून त्यात पावसाच्या पाण्याचा साठा केला जाई.


दौलतींचे शहर म्हणून विख्यात असलेल्या दौलताबादला भेट द्यावी, असा विचार केला. खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात आणि तोच वृत्तांत आपणासाठी इथे टंकत आहे. इतिहास आमचा कच्चा असल्यामुळे, काही चुकीचे लिहिले असेल तर ते आपण तपासून घ्यावे. या शहराने आणि किल्ल्याने अनेक वंशाचे उत्थान पाहिले. यादव, खीलजी, मोगलवंश हे त्यापैकी आहेत, असे म्हणतात.
महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक. युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.
ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.
किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि,मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात

किल्ल्यामधे प्रवेश करतांना अनेक मोठे दरवाजे पार करावे लागतात.

आलेल्या आहेत. या कोठड्यामधे काही जूनी वापरण्याजोगी अवजारे ठेवण्यात आली

चांद मिनार
आहेत. इथेच हत्ती हौद आहे. तसेच जैन मंदिरही आहे. पुढे त्याची तोडफोड करुन येथे मशिद उभारलेली आहे, आणि नंतर त्याचीही तोडफोड करुन तेथे आता एका भारतमातेचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. हे बद्ल स्वातंत्र्यानंतर झाले असावेत.
चांद मीनार. या मंदिरातून म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे तर उजव्या बाजूला चांद मिनार आहे. दोनशे दहा फूट उंचीचा एक गोलाकृती मीनार येथे आहे. आता तो प्रवेशासाठी बंद करण्यात आलेला आहे.चांदमीनाराच्या पुढे कालाकोट प्रवेशाद्वारानजिक हेमांडपंथी मंदिराचे भग्नावशेष सापडतात.पण आता या किल्यावरुन ते हटवण्याचे काम चालू आहे, पुरातत्वे विभागाला त्याच्याशी काही घेणे नाही. अशा अविर्भावात ते सर्व रस्त्याच्या कडेला पडून आहेत.
20112007118
चीनी महल
भिंतीचा तिसरा भक्कम भाग कालाकोटचे प्रवेशद्वार, पुढे एका डोंगरावर आहे, यावर पोचण्यासाठी पाय-या बांधण्यात आलेल्या आहेत. इथे तीन दरवाजे समकोन स्थितीत आहेत. शत्रुसैनिकावर समोरुन आणि मागच्या बाजूस हल्ला करता यावा या उद्देशाने तशी रचना असावी असे वाटते. याच्या वरती उंचावर एका महालाचे अवशेष असून या महालाला चीनी महल म्हटल्या जती. यातील सजावटीसाठी चीनी टाइल्स वापरण्यात आल्या होत्या. औरंगजेबाने गोलकोंडाचा अंतिम राजा सुल्तान आबूल हुसैन तानाशाह आणि विजापुरचा अंतिम शासक सुल्तान सिकंदर यांना इथेच कैदेत ठेवलेले होते.
रंग महाल येथुन डावीकडे एक लहानश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रंगमहालाचे भग्नावशेष सापडतात विभिन्न खोल्या आणि महालाच्या

#devgirikilla
#devgirifort
#daulatabadkilla
#devgiri #killedevgiri #devgiriforthistory
#devgirikillaaurangabad
#devgirikillavideo #killa
#daulatabadkillaaurangabad
#devgiriforthistoryinmarathi
#devgirikila
#devgirifortaurangabad
#aurangabadkilla #devgirichakilla
#devgirifortdaulatabad
#devgirikillarahasya
#devgirikillachimahiti
#daulatabaddevgirikilla
#devgirikillainaurangabad
#devgirikillachimahitimarathi
#fort #devgirifort
#daulatabadfort
#daulatabad #aurangabad #aurangieb #sambhajinagar #history #devgiri #maharashtraforts

Комментарии

Информация по комментариям в разработке