घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळा

Описание к видео घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळा

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - माणिक वर्मा
चित्रपट - उमज पडेल तर (१९६०)
राग - पहाडी (नादवेध)

घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या साऱ्याचा उद्या गोकुळी
होइल अर्थ निराळा !

सांजवेळ ही, आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो
गोपसुतांचा मेळा !

Комментарии

Информация по комментариям в разработке