सुरू उसाची लागवड केव्हा करावी हिवाळ्यामध्ये सुरू उसाची लागवड कशा प्रकारे केली पाहिजे suru us lagwad

Описание к видео सुरू उसाची लागवड केव्हा करावी हिवाळ्यामध्ये सुरू उसाची लागवड कशा प्रकारे केली पाहिजे suru us lagwad

सुरू उसाची लागवड केव्हा करावी हिवाळ्यामध्ये सुरू उसाची लागवड कशा प्रकारे केली पाहिजे सुरू ऊस लागवड suru us lagwad
हऊस लागवड वामान : विदर्भातील हवामान ऊस पिकाकरिता अत्यंत अनुकूल आहे. २४ ते ३० डि.ग्री. सेंटिग्रेड या तापमानात उसाची वाढ चांगल्याप्रकारे होते. पावसाळ्यात आवश्यक आर्द्रता व हिवाळ्यात पोषक थंडी यामुळे उसाचे उत्पादन व साखर उतारा चांगला मिळतो. फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होते, त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो व उत्पादनात घट होते.

#ऊस_लागवड हंगाम सुरू : जानेवारी-फेब्रुवारी
साखर कारखान्यास पक्व उसाचा सतत पुरवठा होण्यासाठी ऊस लागवडीचे नियोजन २० टक्के लागवड पूर्व हंगामी, ४० टक्के सुरू व ४० टक्के खोडवा याप्रमाणे करावे.

ऊस लागवड सुधारित जाती : विदर्भाकरिता को-४१९, को-७४०, को-७२१५, को-८८१२१, को-८६०३२, कोसी-६७१ आणि को-व्हीएसआय- ०३१०२ या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. ऊस उत्पादन आणि साखर उतारा चांगला मिळण्याचे दृष्टीने को-८६०३२ व कोसी-६७१ या जातीचीच लागवड करणे फायदेशीर आहे. तसेच को व्हीएसआय-०३१०२ या वाणाची लागवड अति पर्जन्यमान असलेल्या पूर्व विदर्भासाठी शिफरशीत आहे.

#agrowone जमीन : मध्यम मगदुराची, पाण्याचा चांगला निचरा होणारी ६० सें.मी. खोल आणि ६.५ साफ असणारी जमीन योग्य असते.

पूर्वमशागत : जमिनीत योग्य प्रकारे मशागत न झाल्यास जमीन क्षारमय होण्याचे प्रमाण वाढते. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत चांगली होणे अत्यंत आवश्यक आहे. पहिली नांगरणी २० ते २५ सें.मी. खोल करावी. १५ दिवस जमीन तापू द्यावी व नंतर पहिल्या नांगरटीला आडवी दुसरी नांगरणी करावी. वखर किंवा तव्याचा कुळव वापरून जमीन भुसभुशीत करावी.

फ्लोट अथवा लाकडी चौकट चालवून जमीन सपाट करावी. त्यानंतर सरीच्या नांगराने ६०:१२०:६० किंवा ७५:१०५:७५ सें.मी. अंतरावर जोड ओळ पद्धतीने अथवा 90 सें.मी. अंतरावर जोड ओळ पद्धतीने अथवा 90 सें.मी. अंतरावर सर्‍या पाडाव्यात. जमिनीच्या उतारानुसार आडवे पाट पाडावेत सर्‍यांची व पाटांची दुरुस्ती ऊस लागवडीपूर्वी करून घ्यावी.

उसाचे बेणे : ऊस बेणे मळ्यातील जातिवंत निरोगी बेणे वापरल्यास उत्पादनात १३-१५ टक्के वाढ होते. उसाचे निरोगी, जाड रसरशीत, लांब कांड्याचे, फुगीर डोळे असलेले १० ते ११ महिने उत्तम रीत्या पोसलेल्या बेणे मळ्यातूनच निवडावे. दोन डोळ्यांचे किंवा तीन डोळ्यांचे हेक्टरी २५ ते ३० हजार बेणे लागवडीकरिता वापरावे. एक डोळ्यांची लागवड उत्तम व्यवस्थापनाखाली करावी. एक डोळा पद्धतीत बेण्याची बचत होते.

बेणेप्रक्रिया : उसावर येणार्‍या काणी, गवताळ वाढ व इतर बुरशीजन्य रोगांवर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून ऊस लागवडीपूर्वी बेणे ०.१ टक्के कार्बेन्डाझिमच्या द्रावणात (१०० ग्रॅम कार्बेन्डाझिम + १०० लिटर पाणी) १० मिनिटे बुडवून लागवड करावी. खवले कीड किंवा पिठ्या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वरील द्रावणात २६५ मि.लि. डायमेथोएट अथवा ३०० मि.लि. मॅलॅथिऑन मिसळावे. सेंद्रिय खते : हेक्टरी २५ टन उत्तम कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. यापैकी निम्मे खत दुसर्‍या नांगरणीपूर्वी शेतात पसरवावे. उरलेले निम्मे खत लागवडीपूर्वी सरीमधून द्यावे. नत्राच्या बचतीकरिता व स्फुरदाची उपलब्धता वाढविण्याकरिता सेंद्रिय खतासोबतच अनुक्रमे हेक्टरी १० किलो ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत, गांडूळ खत, प्रेस फडकेक (७.५ टन, हे.) इत्यादींचा वापर करता येईल.

उसाचे बेणे तयार करणे : बेण्याचा ऊस आणताना शेंडे व पाचटासकट आणावा, म्हणजे वाहतुकीत डोळ्यांना इजा होऊन डोळे खराब होण्याचा धोका टळतो. लागवडीस वेळ असल्यास ऊस सावलीत ठेवावा. बेण्याच्या उसाचे पाचट, पाने हाताने काढावी. त्याकरिता विळा किंवा कोयता वापरू नये. अन्यथा डोळ्यांना इजा होण्याचा संभव असतो. बेणे तोडताना बेणे पिचू नये म्हणून धारदार कोयता वापरावा.
उसाचे बेणे तोडताना डोळ्याचे वर तोडावे, जेणेकरून उगवण होणार्‍या उसाला अन्न व पाणी यांचा भरपूर पुरवठा सहज उपलब्ध होईल. एक किंवा दोन डोळ्यांचे बेणे तयार करावे. तसेच डोळ्यावर पाचट राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

बेण्याची लागवड : हेक्टरी २५ हजार एक डोळा किंवा दोन डोळ्यांच्या कांड्या लावाव्यात. दोन डोळ्यांच्या कांड्या १० ते १२ सें.मी., तर एक डोळ्यांच्या कांड्या २० ते ३० सें.मी. अंतर ठेवून मांडाव्यात. ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке