Wayanad Landslide: गुहेत अडकलेल्या तीन चिमुरड्यांसाठी आठ तासांचं Rescue Operation कसं पार पडलं ?

Описание к видео Wayanad Landslide: गुहेत अडकलेल्या तीन चिमुरड्यांसाठी आठ तासांचं Rescue Operation कसं पार पडलं ?

#BolBhidu #WayanadLandslide #KalpettaLandslide

३० जुलैच्या मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसानं केरळच्या वायनाडमधलं जनजीवन विस्कळीत केलंय. भूस्खलन आणि दरड कोसळून चार गावं पृथ्वीच्या पोटात गेलीत. सर्वत्र मृतांचा खच पडलाय. आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. ८१ जणांवर वायनाडमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही जवळपास २०० जण बेपत्ता आहेत.अजूनही काहीजण कुटुंबातील लोकांचा शोध घेतायत. पण त्यांना आपले नातेवाईक सापडत नाहीयेत. अशातच शुक्रवारी म्हणजे लँडस्लाईडच्या चौथ्या दिवशी वनविभागाच्या चार जवानांनी एक साहसी रेस्क्यू ऑपरेशन केलंय. या टीमनं कलपेट्टा डोंगरावर एका गुहेत अडकलेल्या कुटुंबाची सुटका केली आहे. हे कुटुंब मागच्या पाच दिवसांपासून गुहेत अडकलं होतं. यात चार लहान लेकरांचा समावेश होता. ज्यांचं वय १ ते ४ वर्षे इतकं होतं. त्यांच्या अंगावर कसलेही कपडे नव्हते.

आकाशातून कोसळणारा मुसळधार पाऊस, लहाग्यांच्या पोटात नसलेला अन्नाचा कण, यामुळे सगळं कुटुंब भूकेनं व्याकूळ झालं होतं. पाच दिवसांपासून गुहेत अडकलेल्या कुटुंबाची कलपेट्टा वनविभागाच्या टीमनं सुटका केलीय. मुसळधार पाऊस कोसळत असताना त्यांनी ७ किलोमीटरचा ट्रेक करत कुटुंबाचा जीव वाचवलाय. जवळपास ८ तास हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं. आता या सगळ्यांना कसं वाचवलं? टीममध्ये कोण कोण होतं? डोंगरावरील गुहेत कुटुंब अडकल्याची माहिती त्यांना कशी मिळाली, एकूणच हे ८ तासांचं रेस्क्यू ऑपरेशन कसं चाललं? याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке