चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)

Описание к видео चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan)

चला जाऊया माझं गाव बघायला 😍 | माझं कोकणातलं गाव - Ambavali, Mandangad (Konkan) आज मी तुम्हाला माझं कोकणातलं गाव बघायला नेणार आहे. माझं गाव कसं आहे हे तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही प्रमाणात बघितलं असेल पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं संपूर्ण गाव दाखवणार आहे. पावसाळ्यात माझं गाव खूप सुंदर दिसतं. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आंबवली हे माझं गाव आहे. माझ्या गावात दोनशेपेक्षा जास्त घरे आहेत. ही घरे कोकणी पद्धतीची कौलारू घरे. उतरत्या कौलारी घरांची शोभा खूप छान असते. आता नवीन घरे सिमेंट चिऱ्याची बनतात पण पूर्वी मातीची कशी घरे होती हे बघायला मिळेल. त्यापूर्वी घरे आणखी वेगळी होती. काळ वेळ जसा बदलतो तसा कोकणातील, माझ्या गावातील घरांचे रुपडे सुद्धा बदलले आहे. गावाकडील खेडेगावातील घरे कसे असतात आजूबाजूचा परिसर कसा असतो हे बघायला मिळेल. पावसाळ्यात कोकणातील गावाच्या आजूबाजूचा परिसर सगळीकडे हिरवागार झालेला असतो. पावसाळ्यात नदी नाले सुरू होतात. सर्व परिसर डोळ्यांना सुखावत असतो. आमच्या गावाच्या शेजारून भारजा नदी वाहते. आमच्या गावचे सौंदर्य आमच्या भारजा नदीच्या खाडीजवळून बघण्यासारखे असते. मी तुम्हाला एक दिवस नक्की माझ्या गावी नेणार आहे. बऱ्याच जणांना माझ्या गावाला भेट द्यायची आहे. तुम्ही माझ्या गावाला जरूर भेट द्या. खास करून माझ्या गावाला भेट द्याल तर तुम्हाला खूप सुंदर नजारे बघायला मिळतील. आमचं गावचं घर कसं आहे हे दाखवलं आहे. आमच्या गावात वाड्या किती आहेत, गावातील गल्ल्या कशा आहेत हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे. तुम्हाला माझ्या गावाचा हा व्हिडीओ कसा वाटला ते जरूर कळवा. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChalaJauyaMazaGavBaghyala #MazaKoknatlaGav #KonkanVillageInMonsoon #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке