चमचमीत आणि झणझणीत सुकवलेल्या खाऱ्या सुरमाईचे कालवण | Surmai Fish Curry | Dried King Fish Curry

Описание к видео चमचमीत आणि झणझणीत सुकवलेल्या खाऱ्या सुरमाईचे कालवण | Surmai Fish Curry | Dried King Fish Curry

Surmai Fish Curry Recipe | How To Make Salted Fish Curry | Maharashtrian Styel Dried Fish Curry | Salted Dried Fish

साहित्य - २५० ग्रॅम सुकवलेली खारी सुरमई, २ कांदे बारीक चिरलेले, ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, १५० ग्रॅम वांगी फोड केलेली, ½ tea spn हळद, २ tbl spn घरगुती लाल मसाला, ६ tbl spn तेल, १¼ tbl spn तांदळाचे पीठ, ३ tbl spn चिंचेचा कोळ.

Homemade Red Masala | घरगुती आगरी कोळी मसाला 👉   • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

कृती - सर्वप्रथम खाऱ्या सुरमाईचे तुकडे कोमट पाण्यात साधारण ५ मिनिटे भिजवून घ्या. त्यानंतर २/३ पाण्यात हेच तुकडे स्वच्छ करा. याने तुकड्यांचा खारपटपणा कमी होतो. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा मऊसर करून घ्या. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालावी आणि छान परतून घ्यावं. परतून झाल्यानंतर यात हळद आणि लाल मसाला घालावा आणि मसाला सुद्धा परतून घ्यावा. मसाला परतून झाल्यावर यात खाऱ्या सुरमाईचे तुकडे आणि सोबत वांगी घालावी. वांगी आणि सुरमईचे तुकडे मसाल्यात चांगले घोळून घ्यावे आणि रस्स्यासाठी सोयीनुसार पाणी घालावे. आता कालवण १० मिनिटे मध्यम गॅसवर चांगले उकळून घ्यावे. १० मिनिटानंतर वांगी शिजलेले दिसतील. आता यात चिंचेचा कोळ आणि तांदळाचे पीठ एकत्र घोळून हळू हळू यात सोडावे आणि एका बाजूने ढवळून घ्यावे. जर एकत्र घातले तर रस्स्यात गुठळ्या पडू शकतात. आता वरून पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालावे आणि ५/१० मिनिटे मध्यम गॅसवर शेवटची उकळी काढावी. वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम खारी सुरमई भाकरी सोबत वाढावी.

टीप - १) मासळी खारी असल्यामुळे या कालवणात मिठाचा वापर करू नये. अगदीच वाटले तर चव चाखून मीठ घालावे.
२) उच्च रक्तदाब आणि हृदयविकार रुग्णांना हे कळावं देऊ नये.

#HowToMakeDriedSaltedFish #salteddriedfish #seafoodrecipe

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business Enquiries 👉 [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке