ज्वारीची भाकरी खाण्याचे ११ फायदे || Jwarichi Bhakri khanyache fayde|| Jowar Roti benefits in Marathi

Описание к видео ज्वारीची भाकरी खाण्याचे ११ फायदे || Jwarichi Bhakri khanyache fayde|| Jowar Roti benefits in Marathi

ज्वारीची भाकरी खाण्याचे ११ फायदे || Jwarichi Bhakri khanyache fayde || Jowar Roti benefits in Marathi

ज्वारीची भाकरी खाण्याचे ११ फायदे

१. ज्वारीमध्ये फायबर्स भरपूर असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, जड वाटणे, पोट साफ न होणे इ. समस्या कधीच होतं नाहीत.

२. ज्वारी मध्ये कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम हे २ घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळेच ज्वारीची भाकरी खाणाऱ्याची हाडे व शिरा मजबूत राहतात.

३. ज्वारीमध्ये लोह देखील आढळते, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. रक्ताल्पता (Anaemia) सारखा आजार होतं नाही.

४. चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ति (immunity) मजबूत राहते.

५. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने शरीरातील bad cholesterol अर्थात LDL cholesterol कमी होते आणि आपला हृदयाशी संबंधित आजार जसे की, हृदय रोग (heart attack), स्ट्रोक (stroke) यांपासून बचाव होतो. हृदय निरोगी राहते.

६. चपातीमध्ये gluten नामक चिकट पदार्थ असतो, जो पोटात चिटकून राहतो व पोटाचे आजार होतात. ज्वारी मध्ये मात्र gluten आढळत नसल्याने ती पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

७. ज्वारीच्या भाकरीत प्रोटीन सुद्धा मुबलक असते, त्यामुळे शरीराला व पेशींना ऊर्जा व बळ मिळते, दिवसभर उत्साही व ताजेतवाने वाटते.

८. तुम्हाला मधुमेह (diabetes) असेल किंवा भविष्यात होऊ नये असे वाटत असेल तर, आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा. कारण ही भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर (blood sugar) नियंत्रणात राहते.

९. ज्वारीमध्ये असलेल्या तांबे आणि लोह या २ घटकांमुळे शरीरातील रक्ताभिसरण (blood circulation) सुरळीत चालते.

१० ज्वारीची भाकरी खाल्ल्याने अकाली वृद्धत्व म्हणजेच अकाली म्हातारपण (premature aging) येत नाही.

११. ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते.

तुमच्या जेवणात काय असते? चपाती की भाकरी? कमेन्ट मध्ये नक्की कळवा.

व्हिडिओ आवडला असेल तर, LIKE SHARE SUBSCRIBE अवश्य करा.

ॐ नमो नारायणा

Комментарии

Информация по комментариям в разработке