Story of MSRTC's Central Workshop Dapodi (C.W.D.) | कहाणी एसटीच्या दापोडी कार्यशाळेची

Описание к видео Story of MSRTC's Central Workshop Dapodi (C.W.D.) | कहाणी एसटीच्या दापोडी कार्यशाळेची

ही कहाणी आहे आशिया खंडातील एकेकाळच्या सर्वात मोठ्या बस बांधणी कार्यशाळेची. बस फॉर अस फाउंडेशन सादर करीत आहे "कहाणी दापोडी कार्यशाळेची". आपण सर्वानी आज पर्यत कधी ना कधी एसटी बस मध्ये प्रवास केला असेलच. महाराष्ट्राच्या पाठीवर असे कोणतेही गाव नाही जिथे एसटी बस जात नाही. काही जण या एसटीला लालडब्बा म्हणतात तर काही लालपरी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि आपण ज्या लालडब्ब्यातून किंवा लालपारीतून प्रवास करत आहोत ती कशी बनते, कुठे बनते? चला तर मग या विशेष डॉक्युमेंट्रीतून माहिती घेऊ एसटीच्या फॅक्ट्रीची अर्थातच दापोडी वर्कशॉपची. एसटीचे बस बांधणीसाठी महाराष्ट्रात एकूण तीन वर्कशॉप कार्यरत आहेत. दापोडी पुणे, चिखलठाण औरंगाबाद आणि हिंगणा नागपूर. यातील दापोडी पुण्याचे वर्कशॉप हे मुख्य वर्कशॉप असून बस बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील आशिया खंडातील एके काळचे सर्वात जुने आणि मोठे वर्कशॉप समजले जाते ज्याला इंग्रजीत CWD अर्थात Central Workshop Dapodi या नावाने ओळखले जाते. बस बॉडी बिल्डिंग हे दापोडी वर्कशॉप चे मुख्य काम असले तरी त्याच बरोबर, जुन्या बसेस चे रिकंडिशनिंग आणि री बॉडी बिल्डिंग, टायर रेमोल्डींग आणि इंजिन रिकंडिशनिंग हि कामे देखील मोठ्या स्तरावर येथे केली जातात. वर्षाला सरासरी एक हजार बसेस ची निर्मिती आणि त्याचाही दुप्पट बसेसचा ची दुरुस्ती आणि पुनर्रबांधणी येथे केली जाते. तर पाहूया या वर्कशॉपचा रोमांचकारी ७० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास.

Bus For Us Foundation

➡️ Supporters of State and Local Transport Undertakings

➡️ Promoters of Public Transport

➡️ Friends of Passengers

Follow & Visit us @

Website - http://busforus.in/
Facebook -   / busforusfoundation  
Instagram -   / busforusfoundation  
Tweeter -   / thebusforus  

Комментарии

Информация по комментариям в разработке