Bhiwandi Lok Sabha मध्ये Sharad Pawar यांच्या तुतारीचा आवाज वाढणार? बाळ्यामामांना फायदा होणार का ?

Описание к видео Bhiwandi Lok Sabha मध्ये Sharad Pawar यांच्या तुतारीचा आवाज वाढणार? बाळ्यामामांना फायदा होणार का ?

#BolBhidu #BhiwandiLoksabha #SharadPawar

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाची ओळख होती. पण २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसच्या हातून हा बालेकिल्ला निसटला, भाजपनं इथं एक नाही दोन टर्म विजय मिळवला. या दोन टर्ममध्ये इथं काँग्रेसचा आमदारही राहिला नाही आणि यंदाच्या जागावाटपात काँग्रेसकडून सीट निसटली. पण म्हणून भाजपसाठी वाट सोपी झाली का ? तर नाही, भाजपनं आपले उमेदवार कपिल पाटील यांचं तिकीट तिसऱ्यांदा रिपीट केलं, पण शरद पवार गटानं इथून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी दिली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा रेसमध्ये आली.

आता जागा रेसमध्ये आणली, म्हणजे काय केलं ? तर बाळ्यामामा हे आगरी समाजातले, तगडा  जनसंपर्क असलेले आणि राजकारणात मुरलेले. त्यामुळं भिवंडी वनसाईड होणार नाही हे तर नक्की होतं. पण तरीही बाळ्यामामांपुढं आव्हान होतंच. कारण काँग्रेसची नाराजी, महायुतीची ताकद आणि मतदानाचा टक्का सगळ्याच गोष्टी चर्चेत होत्या. त्यामुळं कमळ चालणार अशाच चर्चा होत्या, पण या चर्चा सध्या बदलल्या आहेत, ही जागा कट टू कट आलीये म्हणून. नेमकं असं काय घडलं की भिवंडीतून तुतारीचा आवाज वाढणार या चर्चांना उधाण आलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке