तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा ।

Описание к видео तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा ।

तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा ॥
भजनाचार्य वै . मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षांतील हे २२ वे पुष्प .
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी विपुल अभंग रचना केली . त्यात परमदैवत श्रीपांडुरंगाचे वर्णन व गुणगान करणारे अभंग बहुसंख्येने आहेत . माऊलींनी रुपकात्मक अभंगांची सुरुवात केली . गोंधळ हा आदिशक्ती जगदंबेसमोर मांडायचा आणि सादर करण्याचा लोकपरंपरेतील महत्त्वाचा प्रकार ! माऊलींनी श्रीपांडुरंग आणि श्री रुक्मिणी मातेला जगदंबा स्वरूप मानलं आणि तिचा गोंधळ मांडला . पंढरपूरची ही विठाई माऊली तिच वर्णन करणारा हा माउलींचा नितांत सुंदर अभंग , वै . दादांच्याच आवाजात ऐकू या . सुमारे पंचावन्न वर्षांपूर्वीचे ध्वनीमुद्रण पुणे आकाशवाणी केंद्राच्या सौजन्याने उपलब्ध आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке