Nyayi Shivaray Powada || || Maharashtrachi Lokagaani Season2|| Episode 4||Shahir Ramanand

Описание к видео Nyayi Shivaray Powada || || Maharashtrachi Lokagaani Season2|| Episode 4||Shahir Ramanand

रामानंद – कल्याण प्रस्तुत
महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2 episode 4

निर्माता
सौ.सावित्राबाई अप्पासाहेब उगले

लेखक – दिग्दर्शक
श्री. शाहिर अप्पासाहेब उगले (लोककला अभ्यासक)
कल्याण उगले

मार्गदर्शक
श्री पांडुरंग घोटकर, गुरुजी (प्रख्यात ढोलकी वादक)
श्री.डॉ. शाहिर देवानंद माळी (प्रख्यात शाहिर)
श्री. शाहीर आप्पासाहेब उगले (लोककला अभ्यासक)
प्रा. शैलजा कुलकर्णी (देवगिरी महाविद्यालय.)

‘न्यायी शिवबा’
निवेदक
शाहिर विक्रांतसिंग राजपूत

गायक -शाहीर रामानंद उगले
गीत. - कल्याण उगले
संगीत - रामानंद- कल्याण

संगीत संयोजन,मिक्सिंग-मास्टरिंग-
दर्शन पेडगावकर

॥ पोवाडा ॥

रयतेचा राजा शिवराया,
आला उद्धाराया,दुःख साराया
प्रजेचा झाला प्रतिपालक
जैसा अर्जुनाचा कृष्णचालक
रणनीतीचा होता मालक ॥जी॥

चालता सहज मैदानी, हाक निर्वाणी,
शिवबाच्या कानी,
व्याकुळ तो वृद्ध कापे थरथर,
न्याय द्यावा मला म्हणे अगोदर
सांगा काय चुकले माझे आजवर ॥जी॥

पाटलाच्या हाती रांझेगाव,बाबाजी राव, पाटलाचे नाव, सांगतो तुम्हाला
आज वरी मिळाली ना शिक्षा त्याच्या कर्माला ॥जी॥

गेली असता लेक पाणवठ्याला,अब्रूवर घाला, त्याने घातला, काळोख झाला
गेली अब्रू म्हणून पोरीनं जीव हो दिला ॥जी॥

राजास आला बघा राग,खवळला वाघ,भडकली आग
दिला आदेश येसाजी कंकास,
जेरबंद करून आणा शंकास,
न्याय मिळेल त्याच रंकास  ॥जी॥

येसाजी गेला धावून,म्हणे नेला असता कापून
असा हुकूम नाही म्हणून,जीव देतो तुला सोडून
पाटलाविना येसाजी कंक आला परतुन  जीजी

रयतेचे तुम्ही रक्षक,झाले भक्षक,लाज तुम्हाला
देव्हाऱ्यात जशी भवानी, समजतो आम्ही, माता स्त्रीयाला
ती महिषासुर मर्दानी रक्षी देवाला,
तशी घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला,
बहिणीची माया ही खरी जपते भावाला,
लक्ष्मी राही जिथे सुखात,खरी दिनरात, सोन्याची वात, पेटलं तेथे
रामा हो जी र दाजी र जी ॥जी॥

शिक्षेची केली बजावणी,ऐकावे कान देऊनी
पोर धरली ज्याच हाताने,ते दोन्ही हात टाका कापूनी
जे पाय गेले धावूनी,तोडावे गुडघ्यापासूनी
जप्त करावी आधी पाटीलकी,ठेवावी ध्यानी ॥जी॥

इतिहास सांगे प्रसंग,अब्रूचा भंग,दावीला जो रंग
तत्काळ शिक्षा भोगून बसला,
तेव्हा ना कुणी आरोपी पोसला
सांगा मग सत्तेचा मार्ग कसला ॥जी॥

असा झाला न्यायनिवाडा, बोध घ्या थोडा, गातो पोवाडा
कवी कल्याण कवन करता,
गुरु देवानंदा चरणी माथा
शाहीर रामानंद गाई गाथा ॥जी॥

कवी : कल्याण उगले 27 डिसेंबर २०२२

Комментарии

Информация по комментариям в разработке