🌺|| श्री सूक्त ||🌺
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्चं पुरुषानहम् ॥२॥
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद-प्रबोधिनीम् ।
श्रियं दे॒वीमुप॑ह्वये श्रीर्मा दे॒वीर्जुषताम् ॥३॥
कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलंतीं तुप्तां तर्पयंतीम् ।
पद्मे स्थितां पद्मवंर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥४॥
चन्द्रां प्रभासां य॒शसा ज्वलंतीं श्रियं लोके दे॒वजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरंणम॒हं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥५॥
आदि॒त्यवर्णे तपसो धिंजा॒तो वन॒स्पति॒स्तव वृक्षोऽथ बिल्वः ।
तस्य फलानि तप॒सा नुदन्तु मायान्तरा॒याश्च वा॒ह्या अलक्ष्मीः ॥६॥
उपैतु मां दे॒वस॒खः कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥७॥
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशया॒म्यहम् ।
अभूति॒मस॑मृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥८॥
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥९॥
मन॑सः काममाकूतिं वा॒चः स॒त्यम॑शीमहि ।
प॒शूनां रूपमन्य॑स्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥
कर्दमेन प्रजाभूता॒ मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥११॥
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।
नि चं देवीं मातरं श्रियं वा॒सय॑ मे कुले ॥१२॥
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलाम् पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१३॥
आर्द्रां य करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१४॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् ॥१५॥
महादेव्यै च वि॒द्महे विष्णुपत्नी चं धीमहि ।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥१६॥
श्री-र्वर्चस्व-मायुष्य- मारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते ।
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥१७॥
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
** !! श्री सूक्त अर्थ !! ** shri suktam meaning
1. हे अग्ने (जातवेद),सोन्यासमान वर्ण असणा-या, सर्व पातकांचे हरण करणा-या (हरिणीसमान सुंदर,चपळ असणा-या), सोन्या-चांदीच्या माळा धारण करणा-या, चंद्राप्रमाणे (शीतल) असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.
2. हे अग्ने, त्या कधीही दूर न जाणा-या (अविनाशी) लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर, जिच्याकडून मला धन, गाय, घोडा तसेच पुरुष (नातलग,मित्र) मिळावेत
3. जिच्या मिरवणुकीत सुरुवातीला घोडे, मध्यभागी रथ आहेत (जी रथात बसलेली आहे), जेथे हत्ती ललकारी देत आहेत, अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो. ती देवी मजवर कृपा करो.
4. जिचे हास्य चमकदार आहे, जी सुवर्णमखरात विराजमान आहे, जी मायाळू आहे, तेजस्वी आहे, स्वतः तृप्त असून इतरांनाही तृप्त करते, जी कमळात स्थानापन्न झाली असून तिची कांती कमळाप्रमाणे आहे, अशा लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो. ती देवी मजवर कृपा करो.
5. चंद्रासमान आभा असलेली, जिचे यश देदीप्यमान आहे, तिन्ही लोकात देव जिची पूजा करतात, जी उदार आहे, अशा या `ई’ नामक लक्ष्मीला मी शरण जातो. माझे दारिद्र्य नष्ट होवो अशी तुला प्रार्थना करतो.
6. हे सूर्याप्रमाणे कांती असलेल्या देवी, तुझ्या तपश्चर्येतून निर्माण झाला बेलाचा वृक्ष. त्याची फळे तपाच्या बलाने (माझ्या) अंतरीचे अज्ञान व बाहेरचे दैन्य दूर करोत.
(टीप- येथे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी लक्ष्मीच्या तपःसामर्थ्याने फुले न येताच फळणारा बेलाचा वृक्ष निर्माण झाला असा अर्थ घेतला आहे).
7. देवांचा मित्र (कुबेर) कीर्ती आणि जडजवाहिर यांचेसह मजकडे येवो. मी या देशात उत्पन्न झालो आहे. तो मला कीर्ती आणि उत्कर्ष देवो.
(टीप– पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ‘मणिना सह’ याचा अर्थ चिन्तामणिसह असा घेतला आहे. परंतु चिन्तामणि हा शब्द निश्चितपणे काय दर्शवितो हे स्पष्ट होत नाही).
8. भूक, तहान, अस्व्च्छता(रूपी) थोरल्या अलक्ष्मीचा मी नाश करतो. संकटे, अपयश या सर्वांना माझ्या घरातून दूर हाकलून दे.
9. जी सुवासांचे प्रवेशद्वार आहे, जिच्यावर आक्रमण दुरापास्त आहे, जेथे नित्य समृद्धी नांदते आणि जी संपन्नेतेचे अवशेष सोडते, अशा त्या सर्व प्राणिमात्रांच्या स्वामिनी लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो.
10. (माझ्या) मनीच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती, वाणीचा सच्चेपणा, पशू, सुंदर रूप आणि अन्न जिच्यामुळे मिळते, ती लक्ष्मी मला यश देवो.
11. जनांसाठी चिखल (कर्दम) हाच आधारभूत आहे. हे कर्दमा (इंदिरेचा पुत्र), तू मजबरोबर रहा. माता लक्ष्मीला माझ्या कुळात स्थापित कर.
12. जलातून ओलसर (चिक्लीत) लोभसता निर्माण होऊ दे. हे चिक्लीता माझ्या घरात निवास कर. (आणि तुझ्याबरोबर) माता लक्ष्मीलाही माझ्या कुलात स्थापन कर.
13. हे अग्ने, कमळांच्या तलावाप्रमाणे रसपूर्ण असणा-या, (जनांचे) पोषण करणा-या, सोनेरी वर्णाच्या, कमळांचा हार घातलेल्या, चंद्रासारख्या (शीतल), सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.
14. हे अग्ने, जी आर्द्र (जगताच्या निर्माणाला) आधार देणारी आहे, कमळांचा हार घातलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, अशा सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.
15. हे अग्ने, दूर न जाणा-या (मजसवे कायम निवास करणा-या), जिच्यात (जिच्यामुळे) मला भरपूर धन, गाई, सेवक, घोडे मिळतील अशा लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.
16. आम्ही महालक्ष्मीला जाणतो, विष्णुपत्नीचे ध्यान करतो. ती लक्ष्मी आम्हाला प्रेरणा देवो.
17. (श्रीलक्ष्मी कृपेकरून) संपत्ती, बल, आयुष्य, आरोग्य, धन, धान्य, (गाई-बैलादि) पशु, अनेक पुत्र, शंभर वर्षांचे दीर्घायुष्य यांनी आमचे जीवन समृद्ध होवो.
Информация по комментариям в разработке