Senior Citizens Home | Maaze Aajol | Projects in Malvan | Homes in Malvan

Описание к видео Senior Citizens Home | Maaze Aajol | Projects in Malvan | Homes in Malvan

माझे आजोळ
"वृध्दाश्रम नव्हे ज्येष्ठ नागरिक सहजीवन"

आयुष्यात सर्वकाही मिळवून आयुष्य संपन्न झालेले बरेच सुदृढ व निरोगी ज्येष्ठ नागरिक असतात. मुंबईच्या गर्दीचा कंटाळा आलेले परंतु मुंबईशिवाय पर्याय नसलेले, गावी एकटे राहणे शक्यच नसलेले ज्येष्ठ आपल्या आजुबाजूला असतात. आयुष्यभर शहरी धकाधकीच्या जीवनात सर्व आघाड्यांवर यशस्वी झाल्यावरही या वयात समवयस्क मित्रांची कमतरता भासते. सुदृढ शरीर, उत्तम कौटुंबिक जीवन, सधन आर्थिक स्थिती आहे परंतु निवांतपणा नाही. सध्याच्या महत्वकांक्षी जगात मुलांनाही आपल्या आईवडिलांसाठी इच्छा असूनही वेळ देता येत नाही, त्याचबरोबर आपल्यामुळे मुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास ओढाताण होऊ नये असेही प्रत्येक पालकास वाटते. कुटुंबात मान, आदर व आपुलकी सारेकाही आहे परंतु शहरी व्यस्त जीवनमानामुळे वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्याय हवा आहे पण वृध्दाश्रम नको.

आता उपलब्ध आहे उत्तम पर्याय माझे आजोळ - ज्येष्ठ नागरिक सहजीवन. वर्षभराचे वास्तव्य, त्याचबरोबर जसे आपण लहानपणी सुट्यांसाठी आजोळी जायचो तशी चार दिवसांसाठीचीही व्यवस्था. ज्येष्ठ प्रियजनांसाठी समवयस्क व्यक्तिंसह कोकणातल्या निसर्गरम्य तिरवडे गावातील आर्यानगरीमध्ये आधुनिक सोय. कौटुंबिक वातावरण, उत्कृष्ट खानपान, स्वच्छ हवा, निसर्गाची साथ, वैद्यकीय सुविधा सारेकाही अगदी चोख, तेही खिशाला परवडणा-या दरात.

• ज्येष्ठ नागरिक सहजीवन वैशिष्ट्ये:
१. वृध्दाश्रम नव्हे तर गावी वास्तव्यास जावे असे तुमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हक्काचे ठिकाण.
२. किमान २ दिवस ते कमाल आजीवन सहवासाची व्यवस्था.
३. तुमची मुले, नातवंडेही सुट्टीत येऊन सोबत वास्तव्य करु शकतात.
४. न्याहारी व शाकाहारी, मांसाहारी जेवण. स्वच्छ व प्रसन्न भोजनकक्ष
५. टीव्ही, इंटरनेट, वाचनालय इ. उपलब्ध.
६. वैद्यकीय सुविधा उपलब्ध
७. दळणवळणाची उत्तम सोय.
८. दैनंदिन बाजार हाकेच्या अंतरावर.
९. उपक्रमाच्या मालकीची आमराई, फळबाग, फुलबाग, भाजीचा मळा.
१०. आवडता छंद जोपासण्याला वाव.

या आणि अशा अनेक वैशिष्ट्यांसाठी एकदा दोन दिवसांसाठी रहायला नक्की या.

संपर्क:-

9422136961
9757112149
9920433088

Please like, share this video and Subscribe to our channel for more properties in Konkan.

Subscribe our YouTube Channel :    / pruthvigroup​  


#maaze_aajol
#senior_citizen_home
#old_age_home

Комментарии

Информация по комментариям в разработке