आमदाराच्या विरोधात नांदेड मध्ये रोष, कॉ.गायकवाड यांनी केली जमावाची बोलती बंद

Описание к видео आमदाराच्या विरोधात नांदेड मध्ये रोष, कॉ.गायकवाड यांनी केली जमावाची बोलती बंद

नांदेड शहरातील कर्मवीर नगर येथील नागरिक आक्रमक झाले असून, गल्ली मध्ये नागरी सुविधा नसल्याने स्थानिक विद्यमान आमदाराच्या विरोधात जनतेमधून रोष पहाव्यास मिळाला. कर्मवीर नगर येथील श्री खरात यांच्या गणपतीच्या आरतीस किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल आणि सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांना निमंत्रित केले होते.
तेव्हा तेथील नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचला आणि आमदारा कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. 400 ते 500 च्या जमास कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दहा मिनिटे भाषण देऊन शांत केले आणि आपल्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलन हाच एकमेव मार्ग असल्याचे मनोगत व्यक्त केले.
ही घटना दि.11 सप्टेंबर 2024 रोजीची असून तेथील नागरिकांनी आंदोलनाची तयारी सुरु केली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке