पितृ दोषाची 8 लक्षणे (कारणे व उपाय) || Pitra Dosha Symptoms Causes and Remedies (in Marathi)

Описание к видео पितृ दोषाची 8 लक्षणे (कारणे व उपाय) || Pitra Dosha Symptoms Causes and Remedies (in Marathi)

पितृ दोषाची 8 लक्षणे (कारणे व उपाय) || Pitra Dosha Symptoms Causes and Remedies (in Marathi)

पितृ दोषाची 8 लक्षणे (कारणे व उपाय)


1. मुलबाळ होतं नाही.. किंवा झालेच तर जन्माला आलेली मुलं मंद, अपंग होतात.. बरेचदा मूल जन्माला येताच मरते.


2. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यात नुकसान होते.


3. कुटुंबात छोट्या गोष्टींवरून मोठे वाद-विवाद होतात.


4. घरात सतत कुणी ना कुणी आजारी राहते. दवाखाना सुटत नाही.


5. विवाहेच्छुक मुलामुलींच्या लग्नात अडथळे येतात. लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुख मिळत नाही. घटस्फोटासारखी परिस्थिती येते.


6. अपघात होण्याचा धोका वाढतो.


7. प्रत्येक शुभ व मंगल कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात.


8. घरातील कर्ता व्यक्ति सतत मानसिक तणावाखाली राहते.


पितृदोष का लागतो? (पितृदोषाची कारणे) :


1. घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू आल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो.


2. पितृदोष पिढ्यानपिढ्या चालू राहतो.


पितृदोष घालवण्यासाठी कोणते उपाय करावे? :


1. पितरांचे फोटो घरात दक्षिण भिंतीवर लावावेत. त्यांना रोज फुलांचा हार घालून स्मरण करावे.


2. पिंपळाला जल, फुले, अक्षत, दूध, गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पितरांना मोक्ष मिळावा, म्हणून प्रार्थना करावी.


3. दर अमावास्येला आणि पितृपक्षातील 14 दिवस संध्याकाळी घराच्या दक्षिणेला पितरांचे स्मरण करीत, तेलाचा दिवा लावावा.


4. गरीब मुलींचे विवाह लावणे किंवा लग्नात मदत करणे, हा पितृदोष दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे.


5. पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जेऊ घालावे. तसेच सत्पात्री दान करावे.


प्रिय दर्शकहो, हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा, धार्मिक माहिती आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचवण्याचे कार्य आम्ही गेल्या 4-5 वर्षांपासून करतो आहोत....


आम्हाला मदत म्हणून व्हिडिओला LIKE करून हा व्हिडिओ Whats app, facebook इ. वर अधिकाधिक शेयर करावा.. ही विनंती!


असे व्हिडिओ वेळेवर मिळण्यासाठी आपल्या Only Marathi चॅनलला Subscribe करून त्याशेजारचं बेल आयकॉन अवश्य दाबा.


ॐ नमो नारायणा

Комментарии

Информация по комментариям в разработке