कॅल्शियम वाढवणारे 27 पदार्थ || Calcium rich Foods in India (in Marathi)

Описание к видео कॅल्शियम वाढवणारे 27 पदार्थ || Calcium rich Foods in India (in Marathi)

कॅल्शियम वाढवणारे 27 पदार्थ || Calcium rich Foods in India (in Marathi)

कॅल्शियम वाढवणारे 27 पदार्थ

1. भाकरीला तीळ लावून खाल्ल्याने किंवा जेवणानंतर 1-2 चमचे तीळ खाल्ल्याने कॅल्शियम झटपट वाढते.

2. अधून-मधून नाचणीची भाकरी खावी. नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.

3. तीळाच्या तेलाचा स्वयंपाकात वापर करा. तसेच या तेलाने केलेली मालीश फायदेशीर ठरते.

4. आवळ्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवतो. तारुण्य टिकविण्यासाठी आवळा नक्की खावा.

5. दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. रात्री झोपताना ग्लासभर दूध अवश्य घ्यावे.

6. शेवग्यासारख्या शेंगभाज्या शरीराला भरपूर प्रोटीनसोबत कॅल्शियम देखील देतात.

7. वाटीभर दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुपारच्या वेळी दही आवर्जून घ्यावे.

8. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. (पालक, शलजम, कोबी, इ.)

9. संत्री, लिंबू यासारख्या आंबट फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

10. सोयाबीन मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. सोयाबीन खाल्ल्याने कॅल्शियम सोबतच फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेट सुद्धा मिळतात.

11. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फोस्फोरस असते. जे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. दररोज मूठभर गूळ शेंगदाणे खाणे आरोग्यदायी असते.

12. सर्वच प्रकारचा सुकामेवा विशेष करून बदाम कॅल्शियमने भरपूर असतात.

13. कडधान्य, डाळी, चीज, दुधाचे पदार्थ यांतून शरीराला कॅल्शियम मिळते.

14. खसखस, तीळ, ओवा, अळशी, सुकलेले अंजीर हे सुद्धा कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहेत.

• अतिगोड पदार्थ जसे की चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.मुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होते.

• हाडांसाठी व दातांसाठी कॅल्शियम फार आवश्यक आहे.

• कॅल्शियममुळेच शरीरातील पाचक द्रव्य सक्रिय राहतात.

• रक्त गोठण्यासाठी तसेच शरीरावर येणारी सूज कमी करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते.

Комментарии

Информация по комментариям в разработке