हंगाम व जमीन
कोबीचे पीक सापेक्षतः थंड आर्द्र हवामानात चांगले येते. भारतात त्याची मुख्यतः हिवाळी पीक म्हणून लागवड करतात. डोंगराळ भागात वसंत ऋतूत व उन्हाळ्यात त्याची लागवड करतात. काही भागांत त्याची दोन पिकेही घेतात.या पिकाला कोणत्याही प्रकारची जमीन चालते.
रोपे तयार करणे
रोप पन्हेरीत गादी वाफ्यावर तयार करतात. त्यात भरपूर शेणखत घालतात. हळव्या पिकासाठी ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये आणि गरव्या पिकासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रोप टाकतात.उन्हाळी पिकासाठी रोप तयार करताना फार काळजी घेतात. जरूर पडल्यास रोप उगवेपर्यंत वाफ्यावर बारदानाचे आच्छादन घालतात. वाढ जोमदार व्हावी म्हणून अमोनियम सल्फेट देतात आणि रोग व किडीपासून बचाव करण्यासाठी कवकनाशके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा नाश करणारी द्रव्ये) आणि कीटकनाशके फवारतात. हळव्या पिकासाठी हेक्टरी ५०० ग्रॅ. व गरव्या पिकासाठी ३७५ ग्रॅ.बी लागते.
लागवड
दोन वेळा उभेआडवे २० सेंमी .खोल नांगरून व कुळवून भुसभुशीत व स्वच्छ केलेल्या शेतास हेक्टरी २५ टन शेणखत देतात.लागवड ३·५×१·५ मी. वाफ्यात अगर ६०–७५ सेंमी. अंतरावर सरीवर करतात. ४–६ आठवड्यांत रोपे कायम जागी लावण्यास तयार होतात. दोन रोपांतील अंतर सामान्यतः वाफ्यात ६० सेंमी. आणि सरीला ४५ सेंमी ठेवतात. दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर संध्याकाळी लागवड करतात व लगेच पाणी भरतात.
वरखते
हेक्टरी सु. ६५ किग्रॅ. नायट्रोजन, ४५ किग्रॅ. फॉस्फरस व ५५ किग्रॅ. पोटॅश यांचा पहिला हप्ता लागवडीच्या वेळी देतात. लागवडीनंतर पाच-सहा आठवड्यांनी फक्त ६५ किग्रॅ. नायट्रोजनाचा दुसरा हप्ता देतात. या पिकाला नायट्रोजनाची फार गरज असते.
पाणी व आंतर मशागत
या पिकाला सतत ओलाव्याची गरज असते, तरी पण गड्डे तयार व्हायला लागल्यावर भरपूर पाणी भरणे टाळावे. कडक उन्हात व दोन पाळ्यांतील अंतर फार झाल्यास भरपूर पाणी भरल्यास गड्डे फुटण्याची भीती असते.
कोबीची मुळे जमिनीत पाच–सात सेंमी.खोल जातात. त्यामुळे त्याला खुरपण्यासारखी हलकी मशागत मानवते. खोल मशागत केल्यास मुळांना इजा पोहोचते.
काढणी व उत्पन्न
योग्य आकाराचे, घट्ट व कोवळे गड्डे काढून त्यांची प्रतवारी करून विक्रीस पाठवितात. तसेच प्रतवारीसाठी भारतीय मानक संस्थेने ठरवून दिलेली मानके वापरतात. ९० – ९५% सापेक्ष आर्द्रता व ००से. तापमानात गड्डे चांगले टिकतात. हळव्या पिकाचे हेक्टरी २०–२५ टन व गरव्या पिकाचे २५–३५ टन उत्पन्न येते.
कीड
(१) काळी माशी :(ॲथॅलिया प्रॉक्सिमा). या किडीचा उपद्रव ऑक्टोबर–मार्च दरम्यान होतो. त्यासाठी पायरेथ्रमाची फवारणी करतात. [→ काळी माशी].
(२) रंगीत ठिपक्याचे ढेकूण:(बॅग्रॅडा पिक्टा). हे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे पिवळी पडतात. ऑक्टोबर–मार्चमध्ये हे क्रियाशील असतात. बंदोबस्तासाठी १०% बीएचसी पिस्कारतात.
(३) मावा:(ब्रेव्हिकॉरिने ब्रॅसिकी). माव्याचा या पिकाला फारच उपद्रव होतो. पीक विक्रीस तयार झाल्यावर माव्याने प्रत कमी होते. प्रतिकारासाठी नियमित एंड्रिन, मॅलॅथिऑन अगर सार्वदैहिक कीटकनाशकाची फवारणी करतात.
(४) गड्डा पोखरणारी अळी:(लिरिओमायझा ब्रॅसिकी). ही गड्डे तयार व्हायला लागल्यावर दिसते. ती सूर्यास्तानंतर कार्यशील असते. ती गड्ड्यांना भोके पाडते आणि त्यात राहते. संध्याकाळी अॅझिन्फॉससारख्या कीटकनाशकाची फवारणी करतात.
रोग
(१) घाण्यारोग :हाझँथोमोनस कँपेस्ट्रिसया सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्याचा प्रसार बियांद्वारे होतो. तेव्हा बंदोबस्तासाठी बियांस जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) पारायुक्त कवकनाशकाची २५ – ३० मिनिटे प्रक्रिया करून रोप टाकतात. तसेच बियांवर उष्णजल प्रक्रिया (५००सें. तापमानाला २५–३० मिनिटे) करतात. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर पिकास कमी व जास्त अंतराने पाणी देतात. तीव्र रोगाने गड्डे अजिबात तयार होत नाहीत.
(२) मुळांवरील गाठी:हाप्लास्मोडिओफोरा ब्रॅसिकीया कवकामुळे होतो. अम्लयुक्त जमिनीत (उदा., महाबळेश्वर) हा आढळतो. मुळांना होणाऱ्या इजेतून त्यांचा वनस्पतीत प्रवेश होतो. त्यामुळे मुळांना वाटोळ्या व लांबट गाठी येतात. पाने मलूल होऊन शेवटी झाड मरते. या रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी दीर्घ मुदतीची फेरपालट करतात आणि रोपे जलविद्राव्य पारायुक्त कवकनाशकाच्या विद्रावात बडुवून लावतात.
(३) करपा:हाआल्टर्नेरिया ब्रॅसिकीकोला या कवकामुळे होतो. कवकाचे बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) व कवकजाल रोगट पाल्यात जिवंत राहतात. बियांवरही कवक बीजाणू असल्यामुळे उगवण कमी होते. रोगामुळे पानांवर लहान काळ्या रंगाचे ठिपके पडतात व ते वाढून वर्तुळाकार होतात. रोगाचे बीजाणू हातास चिकटतात व त्यांचा हवेतून फैलाव होतो. गड्डे साठवणीत काळे पडतात.
patta kobi, kobi, कोबी, सचिन मिंडे कृषिवार्ता, cabbages, sachin minde krushivarta, SMKrushivarta, कोबी लागवड तंत्रज्ञान, Cabbage Cultivation, cabbage vegetable, patta kobi lagvad in marathi, कोबी लागवड तंत्रज्ञान मराठी मध्ये, Cabbage Cultivation in marathi, Cabbage Cultivation in india, cabbage farm, kobichi sheti, अशी करा कोबी पिकाची लागवड, कोबी पिकबद्धल संपूर्ण माहिती, कृषिवार्ता, कोबी शेती
indian farmer marathi, #indianfarmer94, #wawar, #santoshbhai, indian farmer, agribusiness, IF, cauliflower cultivation, कोबी लागवड माहिती, कोबी लागवड यशोगाथा, phoolgobhi, लाल कोबी लागवड, vegetable farming, horticulture farming, Commercial Cabbage Farming Profit, cabbage farming in india, cabbage farming video, cabbage farming business plan, Cabbages Farming Agriculture Technology, cabbage cultivation, red cabbage farming, smart farming, बचतीची कोबी शेती, farming business plan
Информация по комментариям в разработке