डब्यासाठी कच्च्या पपईची भाजी/झटपट बनवा कच्च्या पपईची भाजी

Описание к видео डब्यासाठी कच्च्या पपईची भाजी/झटपट बनवा कच्च्या पपईची भाजी

डब्यासाठी कच्च्या पपईची भाजी/झटपट बनवा कच्च्या पपईची भाजी/पौष्टिक कच्च्या पपईची भाजी


साहित्य
कच्ची पपई
कांदा
टोमॅटो
खोबरं
लसुन
तेल
दही
लाल तिखट
हळद
मीठ
मोहरी
जिरी
हिंग





साहित्य

कच्चा पपईची साल काढून घ्यावी कच्च्या पपईची पूर्ण साल काढून घेतल्यानंतर पपई बारीक कट करून घ्यावी पपई कट करून घेतल्यानंतर कट केलेली पपई उकडून घ्यावी पपई उकडून घेतल्यानंतर उकडलेली पपई एका ताटामध्ये काढून घ्यावी आणि शिल्लक राहिलेले पाणी टाकून द्यावे पाणी टाकून देऊन त्याच भांड्यामध्ये पपईच्या भाजीला फोडणी द्यावी भाजीला फोडणी देण्यासाठी प्रथम कढईमध्ये तेल टाकावे तेल गरम झाले की मोहरी मोहरी तडतडली की जिरे आणि हिंग टाकावा नंतर कांदा परतून घ्यावा कांदा परतून घेतल्यानंतर टोमॅटो टाकावे टोमॅटो व्यवस्थित परतून घेतले की खोबरं आणि लसूण घातलेली पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यावी खोबरं परतून घेतलं की चवीप्रमाणे मीठ टाकावं लाल तिखट आणि हळद टाकून व्यवस्थित परतून घ्यावे कांदा-टोमॅटो व्यवस्थित परतून घेतले की उकडून घेतलेल्या पपईच्या फोडी फोडणीमध्ये टाकाव्यात पपईच्या फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात नंतर एका वाटीमध्ये दही घ्यावे आणि दही व्यवस्थित फेटून घ्यावे आणि नंतर भाजीमध्ये दही टाकावे दही टाकल्यामुळे पपईच्या भाजीची चव छान लागते दही टाकून भाजी थोडीशी परतून घ्यावी आणि दही टाकल्यापासून दोन-तीन मिनिटे भाजी कमी गॅसवर शिजवून घ्यावी म्हणजे आपली पपईची भाजी खाण्यासाठी तयार



धन्यवाद!

   • अशा पद्धतीने पिकलेल्या पपईची मिठाई बन...  

Комментарии

Информация по комментариям в разработке