Vasai Fort History : Maratha सैन्याने पोर्तुगीजांना नमवत जिंकलेल्या वसईच्या किल्ल्याची गोष्ट

Описание к видео Vasai Fort History : Maratha सैन्याने पोर्तुगीजांना नमवत जिंकलेल्या वसईच्या किल्ल्याची गोष्ट

#BBCMarathi #History #maharashtra #shivajimaharaj #forts #vasaifort #किल्ल्यांचीगोष्ट
सुमारे 450-500 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक युरोपीय पद्धतीचं शहर होतं. तिथं अधिकारी-सैनिकांची घरं होती, चर्चेस होती, हॉस्पिटल, बाजारपेठ, न्यायालय, नगरपालिका, कॉलेजेस, विहीरी, बांधलेले रस्ते, हॉटेल्स, सांडपाण्याची व्यवस्था होती असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का?
पण हे खरंच महाराष्ट्रात मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर एक शहर होतं. अनेक उंचच इमारती आणि वर्दळीनं भरलेलं हे शहर थेट वसईच्या किल्ल्यातच होतं.
वसईचा किल्ला हा व्यापाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी भारतात किती बळकटपणे पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उखडून टाकण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याचं उदाहरण म्हणावं लागेल. वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच त्याहून वसईची मोहीम, वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं.
पाहा बीबीसी मराठीची विशेष मालिका किल्ल्यांची गोष्ट
रिपोर्ट - ओंकार करंबेळकर
शूट-एडिट - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке