Ajit Pawar आणि Uddhav Thackeray एकाच ट्रॅकवर आहेत ? दोन्ही नेत्यांची कोंडी कशामुळे झाली आहे ?

Описание к видео Ajit Pawar आणि Uddhav Thackeray एकाच ट्रॅकवर आहेत ? दोन्ही नेत्यांची कोंडी कशामुळे झाली आहे ?

#BolBhidu #AjitPawar #UddhavThackeray

राज्याच्या राजकारणात निवडणूकीची तारिख येईपर्यंत दोन पक्षांच्या आणि दोन नेत्यांच्या भूमिकेबद्दल आजही शंका आणि अनेक शक्यता व्यक्त केल्या जातायत. ते दोन नेते म्हणजे मविआतून उद्धव ठाकरे आणि महायुतीतून अजित पवार. एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे लागल्याचं चित्र आहे, पण शरद पवार आणि कॉंग्रेस कोणत्याही परिस्थितीत आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला तयार नाही. दुसरीकडे अजित पवारांचा संघर्ष हा जागावाटपात स्थान मिळवण्याचा आहे, आपली भूमिका महायुतीच्या आणि त्यांच्या स्वत:च्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. त्यातच ते वेगळे लढण्याची चर्चा जास्त होतेय.

शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फूटीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकाच ट्रॅकवर राहतील अस म्हटलं जात होतं पण लोकसभेनंतर लोकांचा कौल आल्यानंतर आणि विधानसभेच्या तोंडावर ज्या घडामोडी घडतायत त्यातून हे स्पष्ट झालं की एकनाथ शिंदेंनी स्वत:च वर्चस्व सिद्ध केलं आहे. बंडानंतर मुख्यमंत्रीपद मिळवण्यापासून ते एकही आमदार फुटू न देणं, लोकसभेत ठाकरेंपेक्षा जास्ती स्ट्राईक रेटने खासदार निवडून आणणं, यामुळे या ट्रॅकवरून शिंदे अलगद बाजूला झाले आणि तिथे उद्धव ठाकरे येऊन बसले. एकीकडे अजित दादांचं भवितव्य महाराष्ट्रात अधांतरी आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं. हे दोघेही एकाच ट्रॅकवर असल्याची चर्चा का होतेय ? दोघांमध्ये असलेल्या कॉमन गोष्टी कोणत्या पाहूया या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке