Pune मध्ये लोकांना सुचना न देता Khadakwasla Dam मधून पाण्याचा विसर्ग केला ? पुराला जबाबदार कोण ?

Описание к видео Pune मध्ये लोकांना सुचना न देता Khadakwasla Dam मधून पाण्याचा विसर्ग केला ? पुराला जबाबदार कोण ?

#BolBhidu #KhadakwaslaDam #PuneRainUpdates

मागील चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं पुण्यात कहर केलाय. मुठा नदी दुथडी भरून वाहतेय. भिडे पुलासह शहरातील विविध पूल पाण्याखाली गेलेत. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्यात. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे शहरातील सिंहगड रोड, डेक्कन परिसर, एकता नगर, पुलाची वाडी अशा सखल भागांत पाणी साचलंय. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. आज पहाटे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानं शहरात नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. एकता नगरच्या अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्यात. त्यामुळे सगळीकडे भीतीदायक परिस्थिती निर्माण झालीय. लहान मुलं, महिला आणि वृद्धांना या पूरस्थितीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सध्या शहरात बचाव कार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पण या सगळ्या परिस्थितीला आता महापालिका प्रशासनाला जबाबदार धरलं जात आहे. प्रशासनानं पुणेकरांना कसलीही पूर्वसूचना न देता मध्यरात्रीच खडकवासला धरणातून पाणी सोडलं. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाता आलं नसल्याचा आरोप केला जातोय. पण खरंच खडकवासल्याचं पाणी मध्यरात्री लोकांना पूर्वसूचना न देता सोडलं होतं का? बुधवार आणि गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून किती पाण्याचा विसर्ग करण्यात आला? पाण्याचा विसर्ग करताना प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली होती का? NDRF ची पथकं तैनात केली होती का? पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке