Pranju आणि Pradnu खूप खुश झाले 😍 | पप्पा गावी आल्यावरच सुख | Ambavali - Mandangad (Konkan)

Описание к видео Pranju आणि Pradnu खूप खुश झाले 😍 | पप्पा गावी आल्यावरच सुख | Ambavali - Mandangad (Konkan)

Pranju आणि Pradnu खूप खुश झाले 😍 | पप्पा गावी आल्यावरच सुख | Ambavali - Mandangad (Konkan) मुंबईवरून गावी आलो की घरची पोरं खूप खुश होतात. घरातील माणसांमध्ये एक वेगळीच उत्साहाचे वातावरण असते. मी मुंबई पनवेल येथे महिनाभर राहिल्यावर पुन्हा गावी जाण्यासाठी निघालो. सुरुवात झाली खरेदी करण्यापासून, त्यासाठी मी पनवेल मधील डिमार्ट येथे गेलो होतो. Prabhu आणि Pradnu साठी खरेदी केली. गावी जाण्यासाठी सध्या एसटी महामंडळाच्या गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. आमच्या गावी बोरिवली वरून बोरथळ गाडी सुटते. त्या गाडीचे रिझर्वेशन मी केले. सामानाच्या बाग आदल्या रात्री भरून ठेवल्या. सकाळी गाडी बोरिवली येथून सुटते आणि ती गाडी पनवेल येथे सकाळी 7.30 पर्यंत येते. मी सकाळी लवकर उठून पनवेल एसटी स्टँड येथे गेलो. गाडी 2 तास उशिराने आली. #MumbaiToKonkanVillage #Traveling #Msrtc #sforsatish
गाडी पनवेल एसटी स्टँड मधून सकाळी 9 वाजता सुटली. मुंबई गोवा हायवेचे काम जोरात सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याला खड्डे सुद्धा आहेत. एकंदर पाहता रस्ता आता बरा आहे. रामवाडी पेण, माणगाव, महाड करत गाडी मंडणगड येथे पोहचली. टोळ मार्ग बंद आहे. गाडी सध्या लाटवण मार्गे येते. मंडणगड वरून गाडी आमच्या आंबवली स्टॉपवर दुपारी 3.30 वाजता पोहोचली. आई आणि प्रांजु मला नेण्यासाठी आली होती. आमच्या भाराजा नदीची खाडी होडीने पार करून आम्ही घरी पोहोचलो. घरातील सर्व माणसे खूप खुश झाली. मुंबई, शहरातून आपला घरातील कोणी व्यक्ती आला की एक वेगळाच आनंद असतो. लहान मुलांचा आनंद तर गगनात मावेनासा असतो. खाऊची आतुरतेने ते वाट पाहत असतात. मी पुन्हा एकदा माझ्या कोकणातील गावी आलो आहे. मी गावी कसं पोहोचलो त्याचा हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !

संपर्कात राहण्यासाठी मला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा!

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке