संपूर्ण दत्त परिक्रमा दर्शन

Описание к видео संपूर्ण दत्त परिक्रमा दर्शन

संपूर्ण दत्त परिक्रमा दर्शन #dattaguru #parikrama #dattajayanti

दत्त परिक्रमा
श्री दत्त तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून, तिथल्या पुण्याचा लाभ आणि त्या सोबत श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता मिळवून देणारी परिक्रमा म्हणजेच श्रीदत्त परिक्रमा होय . श्रीदत्तात्रेयांबरोबरच त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करतात, त्याला बळ देतात, त्याच्या समस्येतून त्याला सोडवतात आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जातात, असे मानले जाते. श्रीदत्तात्रेयांनी २४ गुरू केले आहेत. या २४ गुरूंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केला आहे. श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरू म्हणजे मानवी शरीरातील २४ शक्तिकेंद्राची प्रतीके आहेत. साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होऊन माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होते आणि त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळते, सृष्टिचक्राशी त्याचा समन्वय होतो, त्याची कार्यक्षमता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. श्रीदत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्तिकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते. या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्रीशंकरमहाराज समाधी मंदिरापासून केली आहे.
१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे
२. औदुंबर
३. बसवकल्याण
४. नृसिंहवाडी
५. अमरापूर
६. पैजारवाडी
७. कुडुत्री
८. माणगाव
९. बाळेकुंद्री
१०. मुरगोड
११. कुरवपूर
१२. मंथनगड
१३. लाडाची चिंचोळी
१४. कडगंजी
१५. माणिकनगर (हुमनाबाद)
१६. गाणगापूर
१७. अक्कलकोट
१८. लातूर
१९. माहूर
२०. कारंजा
२१. भालोद
२२. नारेश्वर
२३. तिलकवाडा
२४. गरुडेश्वर
मित्रांनो दत्त परिक्रमेमध्ये १२ ठिकाणे महाराष्ट्रातील, दोन ठिकाणे आंध्र प्रदेशातील, सहा ठिकाणे कर्नाटकातील आणि चार ठिकाणे गुजरात या राज्यांतील आहेत. एकूण साधारण तीन हजार ६०० कि.मी.चा हा प्रवास बसने अथवा गाडीने करता येतो. श्रीदत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची वगैरे सुविधा उपलब्ध आहेत. श्रीदत्त परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्रीदत्तात्रेयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेली आहेत. दत्त अवताराचे वेगळेपण हेच आहे की, दत्त अवतारांचे कार्य आणि वारसा विविध सत्पुरुषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे. दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते.
दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यांत विविध प्रदेशांत आहे. मात्र दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे. समाजातील विविध स्तरांतील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्त परिक्रमा आहे. दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघते, साधक सुवर्णरूपी होतो. याचे मुख्य कारण म्हणजे अनुभूती. प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वत:मधील शक्तिकेंद्र जागृत करीत असते.


music credit: Avinash Satoskar
Sanjay Salkar

#gurumauli #dattatrey #swamisamarth#shreepadshreevallabh
#marathivlogs #nrusinhasaraswati #akkalkot#pithapuri#pune
#abhangwani #bhajansandhya#audumbar #narsobachiwadi
#marathi#marathisongs#ramanandsagar #mangao#gangapur
#mahur #narmadaparikrama #parikrama

Комментарии

Информация по комментариям в разработке