मोहोर संरक्षण साठी बुरशीनाशकांचा व कीटकनाशकांचा वापर पीक संरक्षण/Uses of insecticides and pesticides

Описание к видео मोहोर संरक्षण साठी बुरशीनाशकांचा व कीटकनाशकांचा वापर पीक संरक्षण/Uses of insecticides and pesticides

*मोहोर संरक्षण व कीड,रोग नियंत्रण प्रशिक्षण
*🔹सेंद्रिय व रासायनिक व्यवस्थापन.
🔹रविवार दि.5/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔸आंबा,काजू ,इतर फळपिके मोहोर संरक्षण. सेंद्रिय कीटकनाशके तयार करणे, रासायनिक फवारणीचे सखोल चर्चासत्र.
🟢 कलम बांधणी प्रशिक्षण
रविवार दि.12/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔹खात्रीशीर आंबा कलमे तुम्ही प्रात्यक्षिक सहित स्वतः बांधायला शिका.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची कलम बांधणी प्रशिक्षण.
आंबा खुंटी कलम (बगल कलम) साईड ग्राफ्टिंग, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी,इस्राईल पध्दतीने कलम लागवड. तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं विषयी सखोल, माहिती प्रशिक्षण.
🟠 नारळ पिक संपूर्ण व्यवस्थापन
रविवार दि.19/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔸नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळास इंजेक्शन देणे, नारळ सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, सोंड्या भुंगा व गेंड्या भुंगा नियंत्रण

🟢 स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग . येथे
🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
-------------------------------------
🔹प्रवेश शुल्क - 500 रु चहा,नाश्ता, जेवण सह
-------------------------------------
🔹_*नोंदणी संपर्क -
सुधाकर -8080470400
7039169662
निलेश - 9604410063
-------------------------------------
🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्ध/एक ली.बाटली आणावी)
(कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
**********************
सेंद्रिय शेती प्रशिक्षण
   • गांडूळखत,सेंद्रिय शेती प्रशिक्षण/Varm...  

सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
   • सेंद्रिय शेती प्रशिक्षण/ गो कृपा अमृत...  

🔹!! धन्यवाद!!🔹
श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.

ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता.
( Deficiency Syndromes)

💧🌾 *1) नत्र -* झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.

💧🌾 *2) स्फुरद -* पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

🌾💧 *3) पालाश -* पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

🌾💧 *4) जस्त -* पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो.
पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

💧🌾 *5) लोह -* शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ
खुंटते.

🌾💧 *6) तांबे -* पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद
वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

💧🌾 *7) बोरॉन -* टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन
पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.

💧🌾
9) मॉलिब्डेनम -
पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात.
पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

💧🌾 *10) गंधक -* झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.
____________________

(Synergism & Antagonism)

P पचवन्यासाठी पिकाला--
Zn Mn Fe B लागते.

N पचवन्यासाठी--
Mo Cu S B लागते.

K पचवन्यासाठी --
Ca Mg B लागते.

N जास्त झाल्यावर--
K Mo Ca Mg कमी पडते.

P जास्त झाल्यावर --
Zn Cu Fe N कमी पडते.

K जास्त झाल्यावर--
Mg N Ca B Mg K Ca कमी पडते.

Ca जास्त झाल्यावर--
P Mg Zn B कमी पडते.

Zn जास्त झाल्यावर --
Ca Fe K कमी पडते.

Fe जास्त झाल्यावर--
Cu Zn P Mn कमी पडते.

Cu जास्त झाल्यावर--
Mn Fe कमी पडते.

Na जास्त झाल्यावर--
K Ca Mg कमी पडते.

म्हणून अन्नद्रव्ये बेलेन्स करून दिली पाहिजेत.

म्हणजे एक जास्त झाल्यावर दूसरे कमी पडू नये आणि पिकामधे अडचणी येवू नये

Комментарии

Информация по комментариям в разработке